64MP सह येणाऱ्या Realme 12 Pro+ 5G वर मिळतोय भारी Discount, ‘या’ ठिकाणी Best ऑफर्ससह उपलब्ध
Realme ने अलीकडेच आपली नवीन स्मार्टफोन सिरीज Realme 14 Pro लाँच केली आहे.
सध्या Realme 12 Pro+ 5G वर मोठ्या प्रमाणात सवलती आणि ऑफर्स मिळत आहेत.
प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वर तुम्हाला सवलती मिळत आहेत.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme ने अलीकडेच आपली नवीन स्मार्टफोन सिरीज Realme 14 Pro लाँच केली आहे. त्यानंतर, कंपनी आपले जुने स्मार्टफोन्स मॉडेल्स सवलतीसह उपलब्ध करून दिले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, सध्या Realme 12 Pro+ 5G वर मोठ्या प्रमाणात सवलती आणि ऑफर्स मिळत आहेत. हा स्मार्टफोन कंपनीने मिड बजेट रेंजमध्ये सादर केला आहे. प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वर तुम्हाला सवलती मिळत आहेत. जाणून घेऊयात किंमत आणि ऑफर्स-
SurveyAlso Read: अनोख्या ट्रान्सपरंट डिझाईनसह Nothing आणतोय नवा स्मार्टफोन, मिळतील अनेक Powerful फीचर्स

Realme 12 Pro+ 5G ची किंमत आणि ऑफर्स
Realme 12 Pro+ 5G फोनच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत Amazon वर 37,999 रुपये इतकी आहे. मात्र, तुम्ही हा फोन Amazon वरून 28,890 रुपयांना खरेदी करता येणार आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Realme 12 Pro+ 5G फोनवर बँक कार्डसह 2000 रुपयांची स्वतंत्रपणे सूट मिळेल. अशा परिस्थितीत आपण 26,890 रुपये फोन खरेदी करण्यास सक्षम असणार आहेत. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
Realme 12 Pro+ 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Realme 12 Pro+ 5G फोनमध्ये 6.7 इंच लांबीचा फुल HD OLED कर्व डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन स्नॅपड्रॅगन 7 एस जेन 2 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. या प्रोसेसरद्वारे आपल्याला लॅग-फ्री गेमिंग मल्टीटास्किंग आणि वेगवान कनेक्टिव्हिटी सारख्या सुविधा मिळतील. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 8GB RAM आणि 12GB असे दोन रॅम पर्याय आहेत. तसेच, स्टोरेजमध्ये 128GB आणि 256GB स्टोरेजची सुविधा देखील समाविष्ट आहे.

Realme 12 Pro+ 5G फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये तुम्हाला 50MP चा प्रायमरी कॅमेरा मिळत आहे. त्याबरोबरच, यात 8MP चा सेकंडरी कॅमेरा आणि 64MP चा तिसरा कॅमेरा देण्यात आला आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. पॉवर बॅकअपसाठी, फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 67W फास्ट चार्जिंग समर्थन मिळेल.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile