उत्तम कॅमेरा आणि कमी बजेटमध्ये Pocoचा नवीन 5G स्मार्टफोन लवकरच होणार लाँच, जाणून घ्या फीचर्स

Updated on 10-Jun-2022
HIGHLIGHTS

Poco F4 5G लवकरच भारतात लाँच होणार

स्मार्टफोनची किंमत 25 ते 30 हजार रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता

डिव्‍हाइसमध्‍ये मिळणार 120Hz रिफ्रेश रेटसह डिस्‍प्‍ले

POCO लवकरच आपला नवीन 5G स्मार्टफोन लाँच करणार आहे. याबाबत कंपनीनेच माहिती दिली आहे. नवीन स्मार्टफोनचे नाव Poco F4 5G असेल. Poco F4 मध्ये Snapdragon 870 SoC चिपसेट असेल. कंपनीने टीझर दाखवला आहे, पण लाँचची तारीख अद्याप उघड झालेली नाही. नवीन टीझरनुसार, तो जागतिक स्तरावर लवकरच येईल. Poco F4 भारतात ग्लोबल इव्हेंटसह लाँच केला जाईल. हे Flipkart द्वारे खरेदीसाठी उपलब्ध असण्याची शक्यता आहे. चला तर एक नजर टाकुयात नवीन स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सवर… 

हे सुद्धा वाचा : Airtelचा जबरदस्त रिचार्ज प्लॅन, 5 OTT मेंबरशिप फक्त 148 रुपयांमध्ये उपलब्ध

फीचर्स :

इतर Poco F4 फीचर्स अजूनही अज्ञात आहेत. कंपनी लवकरच आणखी टीझर रिलीज करेल अशी अपेक्षा आहे. अफवा मिलनुसार, हा फोन एक रिबॅज Redmi K40S आहे. त्यामुळे, Poco F4 5G ग्लोबल व्हेरियंटमध्ये चीनमधील Redmi K40S प्रमाणेच फीचर्स असण्याची शक्यता आहे. Poco F4 मध्ये 1080 x 2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.67-इंच लांबीचा फुल HD + डिस्प्ले असेल. तसेच, AMOLED स्क्रीन फ्लॅट असून यात 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देखील असेल.

Poco किमान 6GB RAM सह हे उपकरण जागतिक स्तरावर लाँच करेल अशी अपेक्षा आहे. निवडक बाजारपेठांमध्ये फोनमध्ये 8GB आणि 12GB रॅम पर्याय उपलब्ध असतील. Poco F4 5G मायक्रो SD कार्डद्वारे स्टोरेज एक्सपेन्शनला सपोर्ट करणार नाही. यात 256GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज असण्याची शक्यता आहे. 

याव्यतिरिक्त, यामध्ये मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल. Redmi K40S मध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह 48MP मुख्य कॅमेरा आहे. तर Poco F4 5G ग्लोबल व्हेरियंटमध्ये OIS सपोर्टसह 64MP मुख्य कॅमेरा असल्याचे सांगितले जात आहे. यात 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा असेल. POCO च्या या फोनची किंमत 25 ते 30 हजार रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :