Airtelचा जबरदस्त रिचार्ज प्लॅन, 5 OTT मेंबरशिप फक्त 148 रुपयांमध्ये उपलब्ध

Airtelचा जबरदस्त रिचार्ज प्लॅन, 5 OTT मेंबरशिप फक्त 148 रुपयांमध्ये उपलब्ध
HIGHLIGHTS

Airtelकडून 148 रुपयांचे व्हाउचर लाँच

विशेष म्हणजे प्लॅनमध्ये OTT बेनिफिट उपलब्ध

OTT बेनिफिट एकूण 28 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध

Bharti Airtel ने 15GB FUP डेटासह 148 रुपयांचे व्हाउचर लाँच केले आहे. हे 4G डेटा व्हाउचर आहे, हे प्लॅन त्या वापरकर्त्यांसाठी आहे, ज्यांना त्यांच्या प्लॅन्समध्ये अधिक डेटाची आवश्यकता असते. तुम्हाला तुमच्या वर्तमान डेटा व्हाउचरसह हा प्लॅन वापरता येईल. या प्लॅनची ​​सर्वात विशेष गोष्ट म्हणजे यासोबत मोफत OTT बेनिफिट मिळतात. चला तर जाणून घेऊयात या प्लॅनबद्दल सविस्तर माहिती… 

 Airtel चा 148 रुपयांचा डेटा व्हाउचर 

Airtelच्या 148 रुपयांच्या  डेटा व्हाउचरमध्ये वापरकर्त्यांना Airtel Xstream मोबाइल पॅकचा 28 दिवसांसाठी ऍक्सेस मिळेल. या ऑफर अंतर्गत, वापरकर्ते SonyLiv, LionsgatePlay, Eros Now, HoiChoi आणि Manorama Max यासह अनेक OTT प्लॅटफॉर्ममधून निवड करू शकतील. वापरकर्ते Airtel Xstream मोबाइल ऍपद्वारे या OTT प्लॅटफॉर्मवर प्रवेश करू शकतात. म्हणजेच, हे या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.

हे सुद्धा वाचा : भारीच की! OTTplay Premium लाँच, फक्त एका सबस्क्रिप्शनमध्ये 12 OTT प्लॅटफॉर्म्सचा आनंद घ्या

या प्लॅनमध्ये एक कॅच देखील आहे !

 येथे आम्ही तुम्हाला माहितीसाठी सांगतो की या प्लॅनमध्ये उपलब्ध ऑफरसह एक कॅच देखील आहे, म्हणजेच उपलब्ध सर्व OTT ऍपमधून तुम्हाला फक्त एक OTT प्लॅटफॉर्म निवडता येईल. परंतु, या कॅचसह ही डील तुमच्यासाठी वाईट नाही. कारण, तुम्हाला OTT ऍक्सेस 28 दिवसांसाठी मिळतो. म्हणजेच तुम्हाला फक्त 148 रुपयांमध्ये Airtel च्या या प्लॅनसह इतर कॉमन बेनिफिट तसेच OTT फायदे मोफत मिळू शकतात. 

येथे तुम्हाला एक गोष्ट देखील लक्षात ठेवावी लागेल की, तुम्ही हा प्लॅन फक्त तुमचा सध्याचा प्लॅन संपेपर्यंत वापरू शकता. मात्र, तुम्हाला जो OTT लाभ मिळत आहे, तो तुम्हाला पूर्ण 28 दिवसांसाठी मिळतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo