Noise ColorFit Pro 6 सिरीज आज भारतात लाँच करण्यात आली आहे. कंपनीने या सिरीजअंतर्गत भारतात Noise ColorFit Pro 6 आणि Noise ColorFit Pro 6 Max हे दोन स्मार्टवॉच सादर केले आहेत. यापूर्वी ही स्मार्टवॉच CES 2025 मध्ये सादर करण्यात आली होती. कंपनी या स्मार्टवॉचला ‘इंटेलिजन्स ऑन युअर रिस्ट’ सह प्रमोट केले आहे, जी अनेक AI फीचर्स देते. नॉईज हेल्थ सूटच्या माध्यमातून वॉचमध्ये अनेक हेल्थ फीचर्स देखील आहेत. जाणून घेऊयात किंमत आणि सर्व तपशील-
Also Read: बहुप्रतीक्षित Samsung Galaxy S25 सिरीजचे उद्या लाँच इवेंट LIVE कधी आणि कुठे पाहता येईल? वाचा डिटेल्स
कंपनीने Noise ColorFit Pro 6 Max मेटल स्ट्रॅप व्हेरिएंटची किंमत 7,999 रुपये इतकी निश्चित केली आहे. ही वॉच मेटल, मॅग्नेटिक, लेदर, सिलिकॉन स्ट्रॅप पर्यायांमध्ये सादर केला आहे. तर, मेटल स्ट्रॅपची प्युर टायटॅनियमची किंमत 7,499 रुपये इतकी आहे. लेदर स्ट्रॅपची किंमत 7,499 रुपये आहे. सिलिकॉन स्ट्रॅप 7,499 रुपयांना देण्यात आला आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टवॉचची विक्री 21 जानेवारी 2025 पासून सुरु झाली आहे.
Noise ColorFit Pro 6 Max मध्ये 1.96 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 410x502px पिक्सेल आहे. ही वॉच EN2 प्रोसेसरने सुसज्ज आहे. या वॉचमध्ये 100 हून अधिक स्पोर्ट्स मोड आहेत. आरोग्यासाठी, स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट, SpO2, स्ट्रेस इ. अनेक फीचर्स आहेत. त्याबरोबरच, वॉचमध्ये इंटेलिजेंट नोटिफिकेशन्स, जेश्चर, इमर्जन्सी SOS, पासवर्ड प्रोटेक्शन सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. यात 10 संपर्काची नावे सेव्ह केली जाऊ शकतात. पाण्यापासून बचाव करण्यासाठी वॉचमध्ये 5ATM देण्यात आले आहेत.
Noise ColorFit Pro 6 च्या Mesh स्ट्रॅप व्हेरिएंटची किंमत 6,499 रुपये आहे. मॅग्नेटिक स्ट्रॅप व्हेरिएंट 5,999 रुपयांना येतो. तर ब्रेडेड स्ट्रॅप 5,999 रुपयांना सादर करण्यात आला आहे. सिलिकॉन स्ट्रॅप देखील 5,999 रुपयांना उपलब्ध असेल. या स्मार्टवॉचची विक्री 29 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
Noise ColorFit Pro 6 मध्ये 1.85 इंच AMOLED डिस्प्ले आहे. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 390×450 पिक्सेल आहे. ही वॉच EN2 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यामध्ये 100 हून अधिक स्पोर्ट्स मोड आहेत. आरोग्यासाठी, स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट, SpO2, ताण इ. अनेक फीचर्स आहेत. पाण्यापासून संरक्षणासाठी वॉचमध्ये IP68 देण्यात आला आहे. वॉचमध्ये इंटेलिजेंट नोटिफिकेशन्स, जेश्चर, इमर्जन्सी SOS, पासवर्ड प्रोटेक्शन सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी ही वॉच ब्लूटूथ v5.2 सपोर्टसह येते.