बहुप्रतीक्षित Samsung Galaxy S25 सिरीजचे उद्या लाँच इवेंट LIVE कधी आणि कुठे पाहता येईल? वाचा डिटेल्स 

HIGHLIGHTS

Samsung ची Samsung Galaxy S25 सिरीज अखेर लाँचसाठी सज्ज

Samsung Galaxy S25 सीरीज 22 जानेवारीला लाँच होणार आहे.

सिरीजअंतर्गत Samsung Galaxy S25, Galaxy S25 Plus आणि Galaxy S25 Ultra ची घोषणा केली जाईल.

बहुप्रतीक्षित Samsung Galaxy S25 सिरीजचे उद्या लाँच इवेंट LIVE कधी आणि कुठे पाहता येईल? वाचा डिटेल्स 

साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung ची Samsung Galaxy S25 सिरीज अखेर लाँचसाठी सज्ज झाली आहे. या सिरीजच्या लाँचची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. अखेर 22 जानेवारी रोजी ‘Galaxy Unpacked Event’ मध्ये कंपनीचे नवीनतम फ्लॅगशिप स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत दाखल होतील. या सिरीजअंतर्गत Samsung Galaxy S25, Galaxy S25 Plus आणि Galaxy S25 Ultra ची घोषणा केली जाईल. Samsung ची गॅलेक्सी S सीरिज थेट Apple च्या iPhone शी स्पर्धा करेल. जाणून घेऊयात डिटेल्स-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: नवीनतम Realme GT 7 Pro वर मिळतोय तब्बल 6000 रुपयांपर्यंत Discount, पहा Best ऑफर्स

Galaxy Unpacked January 2025

Samsung चा ‘Galaxy Unpacked January 2025’ कार्यक्रमाचे आयोजन करत आहे जो 22 जानेवारी रोजी कॅलिफोर्निया, USA येथे होणार आहे. हे इवेंट Samsung India वेबसाइट आणि ब्रँडच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर LIVE दाखवले जाणार आहे. तुम्ही खालील विंडोमध्ये Galaxy S25 सिरीज लाँच लाइव्ह देखील पाहू शकता.

आम्ही तुम्हाला सांगतो की, हा कार्यक्रम भारतीय वेळेनुसार रात्री 11.30 वाजता सुरू होईल. इव्हेंटदरम्यान Samsung Galaxy S25, Galaxy S25 Plus आणि Galaxy S25 Ultra ची किंमत आणि भारतीय विक्री तपशील या कार्यक्रमाच्या प्लॅटफॉर्मवर घोषित केले जातील.

Samsung Galaxy S25 सिरीजबद्दल लीक्स

लीकनुसार, Samsung Galaxy S25 सीरीज 22 जानेवारीला लाँच होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या सीरीजचे बेस मॉडेल भारतात 79,999 रुपयांना सादर केले जाऊ शकते, अशा चर्चा सुरु आहेत. लीकवर विश्वास ठेवल्यास, Galaxy S25 5G फोन Exynos 2500 प्रोसेसरसह आणला जाऊ शकतो. लीकनुसार, हा मोबाइल 12MP सेल्फी कॅमेराला सपोर्ट करेल. बॅक पॅनलवर 50MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल. या फोनची बॅटरी पॉवर 5000mAh पेक्षा कमी असेल.

Samsung Galaxy S25 Slim
Samsung Galaxy S25 Slim

लीकनुसार, Samsung Galaxy S25 Plus चे स्क्रीन साईज S25 5G फोनपेक्षाही मोठा असेल. या फोनमध्ये LTPO AMOLED 2x डिस्प्ले देखील दिला जाऊ शकतो. फोटोग्राफीसाठी या फोनच्या मागील पॅनलमध्ये 50MP मुख्य सेन्सरसह 10MP 3x टेलीफोटो सेन्सर आणि 12MP अल्ट्रावाइड लेन्स दिले जाऊ शकतात. यामध्येही 12MP सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. तसेच, Samsung Galaxy S25 Ultra चा कॅमेरा खूप खास असेल. लीकनुसार, या फोनमध्ये 200MP कॅमेरा असेल. तर, त्याच्या क्वाड रियर कॅमेरा सेटअपमध्ये 200MP मुख्य सेन्सर सोबत 50MP पेरिस्कोप सेन्सर, 50MP अल्ट्रावाइड अँगल लेन्स, 10MP टेलिफोटो लेन्स आणि 12MP चा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo