नवीनतम Realme GT 7 Pro वर मिळतोय तब्बल 6000 रुपयांपर्यंत Discount, पहा Best ऑफर्स
लेटेस्ट Realme GT 7 Pro हा भारतीय बाजारात अलीकडेच लाँच करण्यात आला.
लाँच झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांनंतर कंपनीने या फोनवर एक उत्तम ऑफर आणली आहे.
Realme GT 7 Pro सध्या 6000 रुपयांपेक्षा जास्त डिस्काउंटवर खरेदी केला जाऊ शकतो.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme चे स्मार्टफोन भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, Realme GT 7 Pro हा भारतातील पहिला स्मार्टफोन आहे, जो Qualcomm Snapdragon 8 Elite प्रोसेसरवर लाँच करण्यात आला आहे. हा फोन दोन महिन्याआधीच भारतीय बाजारात जाहीर करण्यात आला होता. लाँच झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांनंतर कंपनीने या फोनवर एक उत्तम ऑफर आणली आहे. ज्यामध्ये Realme GT 7 Pro 6,000 रुपयांपेक्षा जास्त डिस्काउंटवर खरेदी केला जाऊ शकतो. जाणून घेऊयात ऑफर्स-
SurveyAlso Read: 16GB RAM सह नवीनतम Tecno Spark 30C 5G फोन भारतात लाँच, प्रत्येकाच्या बजेटमध्ये आहे किंमत
Realme GT 7 Pro ची किंमत आणि ऑफर्स
Realme GT 7 Pro फोनचा 12GB रॅम+ 256GB स्टोरेज व्हेरिएंट कंपनीने 59,999 रुपयांना लाँच करण्यात आला. तर, फोनचा 16GB रॅम+ 512GB स्टोरेज व्हेरिएंट 65,999 रुपयांना लाँच केला गेला. त्यानंतर, आता हा फोन मोठ्या सवलतीसह उपलब्ध करून देण्यात आला आहे. फोनच्या 12GB रॅम वेरिएंटवर 5000 रुपयांची सूट आणि 16GB रॅम व्हेरिएंटवर 6000 रुपयांची सूट उपलब्ध आहे.

ऑफरसह हा फोन अनुक्रमे 54,999 आणि 59,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. या सवलतीसह हा फोन Amazon India वर उपलब्ध करून देण्यात आला आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी येथे क्लिक करा!
Realme GT 7 Pro चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Realme GT 7 Pro मध्ये 6.78-इंच लांबीची 1.5k स्क्रीन आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, इको OLED प्लस तंत्रज्ञान आणि 8T LTPO पॅनेलवर तयार केलेला क्वाड-कर्व डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. या फोनमध्ये अल्ट्रासोनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. वर सांगितल्याप्रमाणे, हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसरवर लाँच करण्यात आला आहे. कंपनीने Realme GT7 Pro ला ‘AI powerhouse’ असे म्हटले आहे.

Realme GT 7 Pro फोन AI तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. या मोबाइलच्या AI कार्यक्षमतेमध्ये AI स्केच टू इमेज, AI Motion Deblur, AI गेम सुपर रिझोल्यूशन आणि AI टेलिफोटो अल्ट्रा क्लॅरिटी यासारख्या AI फीचर्सचा समावेश आहे. या फीचर्समुळे इमेज एडिटिंग, स्केच बनवणे आणि मोबाइल गेमिंग सोपे होईल. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये HyperImage कॅमेरा सिस्टम प्रदान करण्यात आली आहे. त्याच्या ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 50MP पेरिस्कोप पोर्ट्रेट IMX882 सेन्सर 8MP अल्ट्रा-वाइड आणि 50MP IMX906 OIS मुख्य लेन्स आहे. फोनच्या फ्रंट पॅनलवर 16MP सोनी सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
पॉवर बॅकअपसाठी स्मार्टफोन भारतात 5,800mAh टायटन बॅटरीवर लॉन्च करण्यात आला आहे. ही मोठी बॅटरी जलद चार्ज करण्यासाठी स्मार्टफोनमध्ये 120W अल्ट्रा चार्ज तंत्रज्ञान देण्यात आले आहे. Realme नुसार हा फोन केवळ 11 मिनिटांत 50% पर्यंत बॅटरी चार्ज होऊ शकतो.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile