16GB RAM सह नवीनतम Tecno Spark 30C 5G फोन भारतात लाँच, प्रत्येकाच्या बजेटमध्ये आहे किंमत
Tecno ने Tecno Spark 30C स्मार्टफोनचा नवीन 8GB रॅम व्हेरिएंट भारतात लाँच केला.
या नवीन रॅम व्हेरिएंटसह कंपनी 8GB व्हर्च्युअल रॅमला देखील सपोर्ट करेल.
Tecno Spark 30C स्मार्टफोन बजेट श्रेणीमध्ये लाँच करण्यात आला आहे.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Tecno ने Tecno Spark 30C स्मार्टफोनचा नवीन 8GB रॅम व्हेरिएंट भारतात लाँच केला आहे. या नवीन रॅम व्हेरिएंटसह कंपनी 8GB व्हर्च्युअल रॅमला देखील सपोर्ट करेल. त्यानुसार तूम्हाला कळलंच असेल की, या फोनमध्ये यूजर्सना 16GB रॅमचा सपोर्ट मिळणार आहे. हा स्मार्टफोन बजेट श्रेणीमध्ये सादर करण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 48MP Sony IMX582 प्राथमिक कॅमेरा आहे. फोनची बॅटरी 5000mAh आहे. जाणून घेऊयात Tecno Spark 30C 5G फोनच्या नव्या व्हेरिएंटची किंमत आणि सर्व तपशील-
SurveyAlso Read: Smartphones Tips: श्श! गुपचूप करा Call Recording, समोरच्याला पत्ताही लागणार नाही, जाणून घ्या कसे?
Tecno Spark 30C 5G ची किंमत
Your speed will never go down. 16GB* RAM aur MediaTek D6300 Fast 5G Processor ke saath, it’s the best deal in town!
— TECNO Mobile India (@TecnoMobileInd) January 20, 2025
Aa raha hai naya #TECNOSpark30C5G, the real #5GKing.#TECNOMobile pic.twitter.com/wwPHdvOqKw
वर सांगितल्याप्रमाणे, Tecno कंपनीने नवीन 8GB रॅम व्हेरिएंट Tecno Spark 30C 5G फोन सादर केला आहे. या मॉडेलची किंमत 12,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. या फोनची विक्री उद्या 21 जानेवारीपासून भारतात सुरू होणार आहे. उपलद्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही हा फोन Flipkart वरून देखील खरेदी करू शकता. या फोनमध्ये Azure Sky, Midnight Shadow आणि Aurora Cloud असे तीन कलर ऑप्शन्स देण्यात आले आहेत. हा फोन 8GB रॅम+ 64GB स्टोरेज व्हेरिएंटसह उपलब्ध आहे.
Tecno Spark 30C 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
नवीनतम Tecno Spark 30C 5G स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच डिस्प्ले आहे, या डिस्प्लेचा रिफ्रेश दर 120Hz आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरने सुसज्ज आहे. MediaTek Dimensity 6300 हे एक उत्तम प्रोसेसर आहे. जे ऍडव्हान्स गेमिंग आणि मल्टीटास्किंगसारख्या हाय लेव्हल फीचर्सना सपोर्ट करतो. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 8GB रॅम म्हणजेच 16GB रॅमचा सपोर्ट आहे. त्याबरोबरच, या फोनचे स्टोरेज 128GB पर्यंत आहे.

फोटोग्राफीसाठी, Tecno Spark 30C 5G फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये, वापरकर्त्यांना 48MP सोनी IMX582 प्राथमिक कॅमेरा देण्यात आला आहे. त्याबरोबरच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. कंपनीने हा फोन आधीच भारतात लॉन्च केला आहे. हा फोन आता अधिक रॅम मॉडेल्समध्ये सादर करण्यात आला आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile