Tips: श्श! तुमच्या फोनमध्ये सुद्धा ‘हे’ बदल दिसत आहेत का? लगेच व्हा सतर्क, अन्यथा होईल मोठे नुकसान। Tech News

Updated on 22-May-2024
HIGHLIGHTS

या समस्या दर्शवतात की, तुमचा फोन हॅक होत असल्याची दाट शक्यता आहे.

गेमिंग किंवा Video स्ट्रीमिंगसारख्या हेवी ॲक्टिव्हिटीजसह फोन गरम होत असतो.

आम्ही तुम्हाला काही असे संकेत सांगणार आहोत, जे दर्शवतील की तुमच्या फोनसोबत काहीतरी गडबड आहे.

तुम्हाला सुद्धा काही कालावधीपासून तुमच्या फोनसोबत काही बदल जाणवत आहेत का? म्हणजेच तुमच्या फोनची बॅटरी काही वापर न करता कमी कालावधीतच ड्रेन होत आहे का? किंवा तुमच्या फोनमध्ये हीटिंग प्रॉब्लम सुरु झाली आहे का? या समस्या दर्शवतात की, तुमचा फोन हॅक होत असल्याची दाट शक्यता आहे. जर तुम्हाला देखील अशी शंका असेल तर काळजी करू नका. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला काही असे संकेत सांगणार आहोत, जे दर्शवतील की तुमच्या फोनसोबत काहीतरी गडबड आहे. त्याबरोरबच, आम्ही तुम्हाला फोन सुरक्षित ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या Tips देखील सांगणार आहोत.

हे सुद्धा वाचा: लेटेस्ट Motorola Edge 50 Fusion ची आज पहिली Sale, भारी ऑफर्ससह हजारो रुपयांची होणार बचत। Tech News

लवकरच बॅटरी ड्रेन होणे.

जर तुमच्या फोनची बॅटरी नेहमीपेक्षा जास्त वेगाने संपत असेल आणि फोन वारंवार चार्ज करावा लागत असेल. तर, ते मॅलेशियस ॲप्स किंवा फसवे कोड तुमच्या डिव्हाइसची पॉवर कमी करत, ही देखील शक्यता असते. त्यामुळे, बॅकग्राउंडमध्ये कोणतेही ॲप्स चालू असल्यास, ते रिमूव्ह करा. कारण खूप ॲप्स चालवल्याने तुमच्या डिव्हाइसची बॅटरी लवकर संपेल.

हीटिंग प्रॉब्लम

गेमिंग किंवा Video स्ट्रीमिंगसारख्या हेवी ॲक्टिव्हिटीजसह फोन गरम होत असतो. मात्र, जर तुमचा फोन अशा कोणत्याही कारणाशिवाय गरम होत असेल तर, ते तुमच्या डिव्हाइसवर अनधिकृत नियंत्रण दर्शवू शकते.

गॅलरीमध्ये अपरिचित मीडिया

तुमच्या गॅलरीमध्ये अपरिचित फोटो किंवा व्हिडिओ दिसले. किंवा तुमच्या फोनचा फ्लॅश आपोआप चालू होणे, हे तुमच्या कॅमेऱ्यावर रिमोट कंट्रोल असण्याचे लक्षण असू शकते.

online scam phone hacked

परफॉर्मन्स स्लो होणे.

जर तुमचा एकेकाळचा वेगवान फोन अचानकी स्लो परफॉर्म करत असेल. एवढेच नाही तर, वारंवार मंद होत असेल. तर बॅकग्राउंडमध्ये लपवलेले मालवेअर गुप्तपणे काम करत आहे, असे असण्याची देखील शक्यता आहे.

विचित्र पॉप-अप

जर तुम्हाला फोनवर संशयास्पद पुश नोटिफिकेशन्स मिळत असतील. जसे की, फेक व्हायरस अलर्ट किंवा धमकी देणारे मॅसेज, त्यावर टॅप करणे टाळा, कारण ते ॲडवेअरशी जोडलेले असू शकतात. जे युजर इंटरॅक्शनच्या शोधात आहेत.

मोबाईल डेटाच्या वापरात अनपेक्षित वाढ होणे.

मोबाइल डेटाच्या वापरामध्ये अचानक झालेली वाढ हे सूचित करू शकते की, मॅलेशियस ॲप्स किंवा सॉफ्टवेअर गुप्तपणे तुमचा डेटा बॅकग्राउंडमध्ये वापरत आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :