भारतात लाँच झाला मिजू M3 नोट, किंमत ९,९९९ रुपये

Updated on 11-May-2016
HIGHLIGHTS

मिजूने आपला नवीन स्मार्टफोन मिजू M3 नोट लाँच केला. ह्यात आपल्याला 5.5 इंचाची 1080x1920 पिक्सेल LTPS डिस्प्ले 403 ppi पिक्सेल तीव्रतेसह मिळत आहे. स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर मिडियाटेक हेलिओ P10 प्रोसेसर दिला गेला आहे. स्मार्टफोनची किंमत ९,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे.

मिजूने आपला नवीन स्मार्टफोन मिजू M3 नोट लाँच केला. ह्यात आपल्याला 5.5 इंचाची 1080×1920 पिक्सेल LTPS डिस्प्ले 403 ppi पिक्सेल तीव्रतेसह मिळत आहे. स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर मिडियाटेक हेलिओ P10 प्रोसेसर दिला गेला आहे, जो 1.8GHz गती देतो. ह्या स्मार्टफोनला ३१ मे पासून अॅमेझॉन इंडियाच्या माध्यमातून घेऊ शकता. त्याचबरोबर ह्याचे रजिस्ट्रेशन सुरु झाले आहे. स्मार्टफोनची किंमत ९,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे.
 

ह्या स्मार्टफोनच्या लाँचिंग आधीपासूनच ह्यावर मिडियावर बरीच चर्चा सुरु होती. ह्या स्मार्टफोनच्या निमंत्रणामध्ये असे लिहिले होते की, “लाँग लास्टिंग ब्यूटी इज सून टू बिकम रिअॅलिटी”. हा एक आकर्षक आणि जबरदस्त लूक असलेला स्मार्टफोन असू शकतो.

स्मार्टफोनला दोन प्रकारात लाँच केले गेले आहे, ज्याचे पहिले व्हर्जन 2GB रॅम आणि 16B च्या अंतर्गत स्टोरेजचे असेल. ह्याची किंमत CNY 799 जवळपास ८,२०० रुपयाच्या आसपास आणि दुसरा व्हर्जन 3GB रॅम आणि 32GB स्टोेरज असलेल्या स्मार्टफोनची किंमत CNY 999 जवळपास १०,३०० रुपये आहे.

हा स्मार्टफोन फ्लाईमी ओएस अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर आधारित आहे. त्याचबरोबर ह्यात आपल्याला ड्यूल सिम सपोर्टसुद्धा मिळत आहे. ह्यात आपल्याला 5.5 इंचाची 1080×1920 पिक्सेल LTPS डिस्प्ले 403ppi पिक्सेल तीव्रतेसह मिळत आहे. स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर मिडियाटेक हेलिओ P10 प्रोसेसर दिले गेले आहे, जे 1.8GHz गती देतो. त्याचबरोबर ह्यात 2GB आणि 3GB च्या LPDDR3 रॅम दिली गेली आहे. त्याशिवाय ह्यात दिलेल्या अंतर्गत स्टोरेजला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवूही शकतो.

हेदेखील पाहा – गोष्ट भले वैशिष्ट्यांची असो वा कामगिरीची, पण हे ७ स्मार्टफोन्स त्या सर्वात आहेत अव्वल!

ह्याच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, ह्या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा f/2.2 अॅपर्चर आणि PDAF ऑटोफोकसह दिला गेला आहे. त्याशिवाय ह्यात 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे जो f/2.0 अॅपर्चरने सुसज्ज आहे. त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये एक mTouch 2.1 तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या ह्या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा दिला गेला आहे. कंपनीनुसार हा फिंगरप्रिंट सेंसर खूपच उत्कृष्ट आणि तेज आहे. त्याशिवाय ह्यात 4100mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये 4G LTE, वायफाय 802.11 a/b/g/n, ब्लूटुथ 4.0 सह BLE आणि GPS/A-GPS पर्यायासह दिला आहे.

हेदेखील वाचा – इंटेक्सच्या ह्या नवीन स्मार्टफोनची किंमत आहे केवळ २,७९९ रुपये
हेदेखील वाचा – 
आता लवकरच तुम्ही तुमच्या डेस्कटॉपद्वारा सुद्धा वापरू शकणार व्हॉट्सअॅप

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech.

Connect On :