Samsung Galaxy S25 Series Sale
जानेवारी 2025 मध्ये साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung ने आपली नवीन प्रीमियम स्मार्टफोन सिरीज Samsung Galaxy S25 Series लाँच केली. या सिरीजअंतर्गत Samsung Galaxy S25 Ultra, S25+ आणि S25 हे स्मार्टफोन्स मॉडेल्स सादर करण्यात आले. आम्ही तुम्हाला सांगतो की, आतापर्यंत हे फोन प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध होते. परंतु आजपासून Samsung Galaxy S25 Series अधिकृतपणे ऑनलाइन आणि ऑफलाइन रिटेल चॅनेलवर खुल्या विक्रीसाठी उपलब्ध आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात ऑफर्स-
Also Read: तारीख नोट करा! Realme P3 सीरीजची लाँच तारीख निश्चित, बजेटमध्ये मिळेल Powerful गेमिंग एक्सपेरियन्स
Samsung Galaxy S25 च्या बेस मॉडेल 256GB व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत 80,999 रुपये इतकी आहे. तर, 512GB व्हेरिएंटची किंमत 92,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. हे आइसी ब्लू, सिल्व्हर शॅडो, नेव्ही आणि मिंटमध्ये उपलब्ध आहे. सॅमसंगच्या वेबसाइटवरून खरेदी करणारे ब्लू ब्लॅक, कोरल रेड आणि पिंक गोल्ड सारखे विशेष कलर्स निवडू शकतात.
आम्ही तुम्हाला सांगतो की, पहिल्या सेलदरम्यान जुन्या डिव्हाइसमध्ये ट्रेडिंग करताना खरेदीदारांना 11,000 रुपयांचा अपग्रेड बोनस मिळू शकतो. तसेच, HDFC बँक क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना पूर्ण पेमेंटवर 10,000 रुपयांची सूट किंवा EMI व्यवहारांवर 7,000 रुपयांची सूट, 9 महिन्यांच्या नो-कॉस्ट EMI प्लॅनसह मिळू शकते.
Samsung Galaxy S25+ या मॉडेलची किंमत 256GB व्हेरिएंटसाठी 99,999 रुपये इतकी आहे, तर 512GB व्हेरिएंटची किंमत 1,11,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन नेव्ही आणि सिल्व्हर शॅडोमध्ये उपलब्ध आहे. तसेच, ब्लू ब्लॅक, कोरल रेड आणि पिंक गोल्ड सारख्या अतिरिक्त ऑनलाइन-एक्सक्लुझिव्ह कलर ऑप्शन्सदेखील मिळतील. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, खरेदीदारांना 11,000 रुपयांचा अपग्रेड बोनस मिळू शकतो.
हाय-एंड अल्ट्रा मॉडेलची सुरुवातीची किंमत 256GB व्हर्जनसाठी 1,29,999 रुपये, 512GB मॉडेलसाठी 1,49,999 रुपये आणि 1TB व्हर्जनसाठी 1,65,999 रुपये आहे. हे टायटॅनियम सिल्व्हर ब्लू, टायटॅनियम ग्रे, टायटॅनियम व्हाइट आणि टायटॅनियम ब्लॅकमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये टायटॅनियम जेड ग्रीन, टायटॅनियम जेट ब्लॅक आणि टायटॅनियम पिंक गोल्ड असे एक्सक्लुझिव्ह ऑनलाइन रंग आहेत.
ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, खरेदीदार HDFC बँक क्रेडिट कार्ड वापरुन पूर्ण पेमेंट केल्यास 9,000 रुपयांचा अपग्रेड बोनस घेऊ शकतात किंवा 8,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट निवडू शकतात. याव्यतिरिक्त, 9 महिन्यांच्या नो-कॉस्ट EMI प्लॅनसह 7000 रुपयांची कॅशबॅक ऑफर आहे.
Samsung Galaxy S25 सिरीजवरील पहिल्या सेलमधील ऑफर्सबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुम्हाला Samsung च्या अधिकृत साईटला भेट द्यावी लागेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, या तीन मॉडेल्ससोबत Samsung Galaxy S25 Edge ची देखील टीज केली, जो एक स्लिम आणि लाइटवेट फ्लॅगशिप आहे. डिव्हाइसबद्दल तपशील कमी असले तरी, तो 2025 च्या दुसऱ्या तिमाहीत लाँच होण्याची अपेक्षा आहे.