तारीख नोट करा! Realme P3 सीरीजची लाँच तारीख निश्चित, बजेटमध्ये मिळेल Powerful गेमिंग एक्सपेरियन्स
Realme कंपनीने Realme P3 सीरीजची लाँच तारीख निश्चित केली आहे.
लाँचिंगपूर्वी, कंपनीने Flipkart वर फोनची समर्पित मायक्रोसाइट लाईव्ह केली आहे.
या फोनमध्ये वापरकर्त्यांना एक उत्तम गेमिंग अनुभव मिळेल.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme ची P म्हणजेच पॉवर सिरीज भारतात अगदी लोकप्रिय आहे. या सिरीजमधील आगामी स्मार्टफोन Realme P3 सिरीजच्या लाँचची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे, मात्र अखेर कंपनीने Realme P3 सीरीजची लाँच तारीख निश्चित केली आहे. या सिरीजअंतर्गत, कंपनी Realme P3 Pro स्मार्टफोन लाँच करणार आहे. लाँचिंगपूर्वी, कंपनीने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर फोनची समर्पित मायक्रोसाइट लाईव्ह केली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Realme P3 सिरीजचे भारतीय लॉन्चिंग डिटेल्स-
SurveyRealme P3 सीरीजचे भारतीय लॉन्चिंग
Segment's strongest device has hit the road!
— realme (@realmeIndia) February 6, 2025
The #realmeP3Pro5G, powered by the dynamic Snapdragon 7s Gen 3, delivers the smoothest performance, making it a first in the segment.
Launching on 18th Feb! #BornToSlay
Know More:https://t.co/fTFutAUyxUhttps://t.co/p9FT51EBa0 pic.twitter.com/oEzrs5wkk3
फ्लिपकार्ट साइटवर Realme P3 सिरीजची लाँच तारीख निश्चित करण्यात आली आहे. ही सिरीज 18 फेब्रुवारी 2025 रोजी भारतात लाँच होणार आहे. त्याबरोबरच, कंपनीने आपल्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर हॅन्डलद्वारे Realme P3 ची लाँच डेट जाहीर केली. लाँचिंग इव्हेंट दुपारी 12 वाजता सुरू होईल. लाँच लाइव्हस्ट्रीम कंपनीच्या अधिकृत YouTube चॅनेलवर होईल. याशिवाय, तुम्ही कंपनीच्या X आणि फेसबुक चॅनेलवर देखील लाईव्हस्ट्रीम पाहता येईल.
Realme P3 Pro चे अपेक्षित फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
वर सांगितल्याप्रमाणे, Realme कंपनीने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर फोनची डेडिकेटेड मायक्रोसाइट लाईव्ह केली आहे. त्याद्वारे Realme P3 Pro चे अनेक फीचर्स उघड झाले आहेत. त्यानुसार, या फोनमध्ये एक कर्व डिस्प्ले दिला जाईल. या फोनमध्ये वापरकर्त्यांना एक उत्तम गेमिंग अनुभव मिळेल, असे म्हटले जात आहे. Realme P3 Pro फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7s Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज असेल. कंपनीचा दावा आहे की ही चिप मागील मॉडेलपेक्षा 20% चांगली कामगिरी देईल.

एवढेच नाही तर, दीर्घ गेमिंग सेशन्समध्ये फोन थंड ठेवण्यासाठी फोनमध्ये एरोस्पेस-ग्रेड व्हेपर चेंबर कूलिंग सिस्टम असेल. हा फोन KRAFTON च्या भागीदारीत विकसित करण्यात आला आहे, जो एक गेमिंग स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये BGMI गेमप्ले सपोर्ट उपलब्ध असेल, जो AI अल्ट्रा-स्टीडी फ्रेम, हायपर रिस्पॉन्स इंजिन, AI अल्ट्रा टच कंट्रोल आणि AI मोशन कंट्रोल सारख्या फीचर्सने सुसज्ज असेल. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 6000mAh बॅटरी असेल, ज्यामध्ये 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile