5G Smartphone price under 10K Samsung Galaxy F06 5G with 50MP Camera phone price drop on Flipkart
साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung चे बजेट स्मार्टफोन भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. गेल्या आठवड्यात भारतात Samsung Galaxy F06 5G फोन लाँच करण्यात आला. या स्मार्टफोनचा पहिली सेल आज म्हणजे 20 फेब्रुवारी रोजी Flipkart वर लाईव्ह झाली आहे. पहिल्या सेलदरम्यान या फोनवर मोठ्या प्रमाणात सवलती उपलब्ध आहेत. तसेच, यासह परवडणारे EMI आणि एक्सचेंज ऑफर देखील मिळतील. पाहुयात Samsung Galaxy F06 5G वरील ऑफर्स-
Also Read: 50MP कॅमेरासह येणाऱ्या Samsung Galaxy S24+ 5G फोनवर Discount, होईल हजारो रुपयांची बचत
Samsung Galaxy F06 5G फोनच्या 4GB + 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 9,499 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. या हँडसेटचा टॉप व्हेरिएंट म्हणजेच 6GB रॅम+ 128GB स्टोरेज मॉडेल 10,999 रुपयांना उपलब्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर 500 रुपयांपर्यंत सूट आणि नो-कॉस्ट EMI दिले जात आहे. हा फोन Flipkart वर बहामा ब्लू आणि लिट व्हायलेट कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
Samsung Galaxy F06 या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच लांबीचा HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे. उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या हँडसेटमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 प्रोसेसर देण्यात आला आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची स्टोरेज 128GB आहे, जी SD कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता येते. हा फोन Android 15 आधारित One UI 7 वर कार्य करतो.
फोटोग्राफीसाठी, Samsung Galaxy F06 5G स्मार्टफोनमध्ये कंपनीने 50MP प्रायमरी सेन्सर आणि 2MP डेप्थ लेन्स LED फ्लॅश लाईटसह दिला आहे. त्याबरोबरच, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी हँडसेटच्या पुढील बाजूस 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5000mAh ची पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे, जी 25W जलद चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी, यात ब्लूटूथ 5.3, ड्युअल सिम स्लॉट, GPS, ग्लोनास, Wi-Fi आणि USB टाइप-C पोर्ट आहे.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.