50MP कॅमेरासह येणाऱ्या Samsung Galaxy S24+ 5G फोनवर Discount, होईल हजारो रुपयांची बचत 

50MP कॅमेरासह येणाऱ्या Samsung Galaxy S24+ 5G फोनवर Discount, होईल हजारो रुपयांची बचत 
HIGHLIGHTS

Samsung Galaxy S24+ 5G फोनवर मोठी सवलत मिळत आहे.

Samsung Galaxy S24+ 5G या फोनची किमत 4,569 रुपयांनी कमी करण्यात आली आहे.

Samsung Galaxy S24+ 5G वर बँक ऑफर्स, EMI इ. ऑफर्स उपलब्ध

साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung ने अलीकडेच आपली नवी नंबर सिरीज Samsung Galaxy S25 लाँच केली आहे. त्यानांतर, नवीन सिरीज आल्यानंतर जुन्या सिरीजमधील स्मार्टफोन्स सध्या मोठ्या सवलतीसह उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Samsung Galaxy S24+ 5G फोनवर मोठी सवलत मिळत आहे. सध्या हा स्मार्टफोन Flipkart सेलदरम्यान उत्तम सवलतींसह उपलब्ध करून देण्यात आला आहे. ज्याद्वारे या प्रिमियम फोनवर तुमची हजारो रुपयांची बचत होईल. पाहुयात डील्स-

Also Read: लेटेस्ट Vivo X200 Ultra आणि X200S लवकरच होणार लाँच! विशेष फीचर्स झाले Leak

Samsung Galaxy S24 Plus 5G

Samsung Galaxy S24+ 5G ची किंमत आणि ऑफर्स

फ्लिपकार्ट सेलमध्ये Samsung Galaxy S24+ 5G स्मार्टफोन 63,430 रुपयांना उपलब्ध आहे. या किमतीत फोनचा 12GB+ 256GB स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या फोनची किमत 4,569 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, HSBC बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करून सॅमसंगचा हा स्मार्टफोन खरेदी केल्यास 5500 रुपयांची सूट दिली जात आहे.

एवढेच नाही तर, या डिव्हाइसवर 3,106 रुपयांचा मासिक EMI देखील दिला जात आहे. तसेच, या हँडसेटवर एक्सचेंज ऑफर देखील आहे. मात्र, चांगल्या एक्सचेंज व्हॅल्यूसाठी तुमच्या जुन्या किंवा विद्यमान फोनची स्थिती सर्वोत्तम हवी. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

Samsung Galaxy S24+ 5G चे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy S24
Samsung Galaxy S24

Samsung Galaxy S24+ 5G स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच लांबीचा डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. सुरक्षेसाठी यात फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर आहे. चांगल्या कार्यासाठी स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी Samsung Galaxy S24+ फोनमध्ये डेका-कोर सीपीयू देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये LED फ्लॅश लाईटसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP चा पहिला, 10MP चा दुसरा आणि 12MP चा तिसरा सेन्सर आहे. या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये 4000mAh बॅटरी आहे. कंपनीचा दावा आहे की त्याची बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर 29 तास व्हिडिओ प्लेबॅक, 78 तास ऑडिओ प्लेबॅक देईल.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo