Realme 14 Pro Series Launched in India
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme ची नवी Realme 14 Pro सिरीज अलीकडेच भारतात लाँच करण्यात आली आहे. त्यानंतर आज म्हणजेच 23 जानेवारी 2025 पासून हा फोन भारतात खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. या सिरीजअंतर्गत Realme 14 Pro आणि Realme 14 Pro+ 5G असे दोन स्मार्टफोन्स लाँच करण्यात आले. या स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जात आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Realme 14 Pro सीरीजची किंमत आणि त्यावरील उपलब्ध सर्व डील्स-
Also Read: Samsung ने दाखवला आतापर्यंतचा सर्वात स्लिम फोन Samsung Galaxy S25 Edge, जाणून काय मिळेल विशेष?
लेटेस्ट Realme 14 Pro सिरीजचे स्मार्टफोन्स Flipkart वर 12 वाजतापासून खरेदीसाठी उपलब्ध झाले आहेत. किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Realme 14 Pro 8GB+ 128GB स्टोरेज आणि 8GB+ 256GB स्टोरेज ऑप्शन्स उपलब्ध आहेत. या व्हेरिएंट्सची किंमत अनुक्रमे 24,999 रुपये आणि 26,999 रुपये इतकी आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झल्यास, या स्मार्टफोनवर 2000 रुपयांच्या बँक डिस्काउंटसह परवडणारी EMI देखील दिली जात आहे. येथून खरेदी करा
याव्यतिरिक्त, सिरीजचे टॉप मॉडेल Realme 14 Pro+ तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. फोनमध्ये 8GB+ 128GB, 8GB+ 256GB आणि 12GB+ 256GB मॉडेल्स सादर करण्यात आले आहेत. याची किंमत अनुक्रमे 29,999 रुपये, 31,999 रुपये आणि 34,999 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोन 4000 रुपयांची सूट दिली जात आहे. हा फोन परवडणाऱ्या EMI वर घरी आणता येईल. येथून खरेदी करा
Realme 14 Pro 5G मध्ये 6.7-इंच लांबीचा फुल HD प्लस कर्व AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिफ्रेश रेट 120Hz इतके आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 50MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि 16MP फ्रंट कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. तसेच, पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 45W SuperVOOC फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह येते.
Realme 14 Pro+ 5G या फोनमध्ये 1.5K रिझोल्यूशनसह 6.83 इंच लांबीचा कर्व AMOLED डिस्प्ले देण्यात अल्ला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, फोन Qualcomm च्या Snapdragon 7s Gen 3 प्रोसेसरसह येतो. फोटोग्राफीसाठी, यात 50MP मुख्य, 8MP अल्ट्रा वाइड आणि 50MP टेलिफोटो सेन्सर देण्यात आला आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी, यात 6000mAh बॅटरी आहे, जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.