Samsung ने दाखवला आतापर्यंतचा सर्वात स्लिम फोन Samsung Galaxy S25 Edge, जाणून काय मिळेल विशेष?  

HIGHLIGHTS

Samsung ने बुधवारी रात्री Galaxy S25, S25+ आणि S25 अल्ट्रा सादर केले.

कंपनीने Galaxy Unpacked इव्हेंटच्या शेवटी Galaxy S25 Slim ला देखील टीज केले.

आगामी स्लिम स्मार्टफोनचे नाव Samsung Galaxy S25 Edge असे असणार आहे.

Samsung ने दाखवला आतापर्यंतचा सर्वात स्लिम फोन Samsung Galaxy S25 Edge, जाणून काय मिळेल विशेष?  

दक्षिण कोरियाची मोठी इलेक्ट्रॉनिक्स कंपनी Samsung ने बुधवारी रात्री Galaxy S25, S25+ आणि S25 अल्ट्रा सादर केले. दरम्यान, कंपनीने Galaxy Unpacked इव्हेंटच्या शेवटी Galaxy S25 Slim ला देखील टीज केले आहे. पण कंपनीने सांगितले की, त्याचे नाव Samsung Galaxy S25 Edge असे असणार आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, खूप पूर्वी कंपनीने आपल्या एका फोनसोबत ‘एज’ असे नाव वापरले होते. परत एकदा कंपनी हे नाव वापरत आहे.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: लेटेस्ट Samsung Galaxy S25 सिरीजची भारतीय किंमत, तुमच्या बजेटमध्ये बसेल का स्मार्टफोन?

Samsung Galaxy S25 Edge

इव्हेंटदरम्यान Samsung Galaxy S25 Edge शो फ्लोअरवर प्रदर्शित करण्यात आला. त्यामुळे उपस्थितांना त्याच्या स्लिम आणि स्लीक डिझाइनची झलक पाहायला मिळाली. आम्ही तुम्हाला सांगतो की, या फोनमध्ये फ्लॅट एज, फ्लॅट डिस्प्ले आणि ड्युअल रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. या डिझाईनमुळे हा फोन लाइनअपमधील इतर फोन्सपेक्षा वेगळा आहे. इमेजेसवरून हे स्पष्ट झाले आहे की एज खूपच स्लिम फोन असेल आणि यात फक्त दोन मागील कॅमेरे असतील.

लक्षात घ्या की, Samsung ने इव्हेंट दरम्यान Samsung Galaxy S25 Edgeची फीचर्स, किंमत किंवा उपलब्धतेबद्दल कोणतीही विशिष्ट माहिती दिलेली नाही.

Samsung galaxy s25 unpacked,
Samsung galaxy s25 ultra unpacked,
Samsung galaxy s25 edge price,
Samsung galaxy s25 edge review,
Samsung S25 Ultra price,
Samsung S25 Ultra price in India,
Samsung S25 price in India,
Samsung galaxy s25 edge release date,What is the price of Samsung S25?,
Is the S25 launched?,
Will the Samsung S25 have Snapdragon?,
What is the Samsung Galaxy Edge?,

Samsung Galaxy S25 Edge कडून काय अपेक्षित?

Samsung च्या या नवीन स्मार्टफोनबद्दल बरीच माहिती पुढे आली आहे. Samsung Galaxy S25 Edge
अमेरिका आणि दक्षिण कोरियासह निवडक बाजारपेठांमध्ये लाँच केले जाईल, अशी माहिती मिळाली आहे. हा फोन सध्या साऊथ आफ्रिकेत देखील होणार नाही, आधी माहिती तेथील प्रतिनिधींनी दिली आहे. ते म्हणाले की, “म्हणून, आमच्याकडे अल्ट्रा, प्लस आणि बेस मॉडेल असेल. हे दक्षिण आफ्रिकेसाठी असतील. एक स्लिम मॉडेल आहे, जे सुरुवातीला येथे उपलब्ध होणार नाही. ते निवडक बाजारपेठांमध्ये उपलब्ध असेल.” अद्याप कोणतीही अधिकृत लाँच तारीख नसताना, Galaxy S25 Edge काही महिन्यांनंतर दाखल होण्याची अपेक्षा आहे.

Samsung ने Samsung Galaxy S25 Edge च्या स्पेसिफिकेशन्सची पुष्टी केली नसली तरी, लीक्स सूचित करतात की, Samsung Galaxy S25 Edge केवळ 6.4mm जाड असेल, ज्यामुळे तो Galaxy लाइनअपमधील सर्वात स्लिम फोन बनतो. पॉवर बॅकअपसाठी, 3000mAh आणि 4000mAh मधील बॅटरी क्षमता आहे. फोटोग्राफीसाठी, यात 200MP मुख्य कॅमेरा आणि एक स्लिम पेरिस्कोप कॅमेरा मॉड्यूल वैशिष्ट्यीकृत करण्याची अफवा आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo