लेटेस्ट Samsung Galaxy S25 सिरीजची भारतीय किंमत, तुमच्या बजेटमध्ये बसेल का स्मार्टफोन?
Samsung ने काल 22 जानेवारी रोजी बहुप्रतीक्षित Samsung Galaxy S25 सिरीज लाँच केली.
या सीरीज अंतर्गत Samsung Galaxy S25, Galaxy S25 Plus आणि Galaxy S25 Ultra हे तीन स्मार्टफोन लाँच
या सीरिजमध्ये ॲडव्हान्स्ड Galaxy AI फीचर्स देखील देण्यात आले आहेत.
साऊथ कोरियाची प्रसिद्ध आणि लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता Samsung ने काल 22 जानेवारी रोजी Samsung Galaxy S25 सिरीज लाँच केली आहे. या सिरीजच्या लाँचची प्रतीक्षा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. कंपनीने या सीरीज अंतर्गत Samsung Galaxy S25, Galaxy S25 Plus आणि Galaxy S25 Ultra हे तीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, Ultra हा या सिरीजमधील सर्वात प्रीमियम स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन अनेक पॉवरफुल फीचर्ससह येतो. महत्त्वाचे लक्षात घ्या की, Samsung ने हे तिन्ही स्मार्टफोन्स नवीनतम क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसरसह सादर केले आहेत.
SurveyAlso Read: Finally! बहुप्रतीक्षित Samsung Galaxy S25 सिरीज लाँच, नव्या स्मार्टफोन्समध्ये काय मिळेल विशेष?

एवढेच नाही तर, या सीरिजमध्ये ॲडव्हान्स्ड Galaxy AI फीचर्स देखील देण्यात आले आहेत. ज्यामध्ये पर्सनलAI, नाऊ ब्रीफ आणि टॉकिंग AI या फीचर्सचा समावेश आहे. तसेच, Google Gemini सॅमसंग ॲप्सशी कनेक्ट करून अनेक कार्ये पूर्ण करता येतील. कंपनीची ही नवीन फ्लॅगशिप सिरीज तुम्ही प्लॅन केलेल्या बजेटमध्ये आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी पहा किंमत-
Samsung Galaxy S25 सिरीजची भारतीय किमंत
Samsung Galaxy S25 सिरीजची भारतीय किंमत देखील जाहीर करण्यात आली आहे. नवीनतम Samsung Galaxy S25 फोनच्या 12GB रॅम+ 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 80,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. फोनच्या 12GB+ 512GB व्हेरिएंटची किमत 92,999 रुपये आहे. हा फोन आइसी ब्लु, सिल्वर शॅडो, नेव्ही, मिंट या कलर ऑप्शन्ससह उपलब्ध आहे.
त्याबरोबरच, Samsung Galaxy S25 Plus च्या 12GB RAM+ 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 99,999 रुपये इतकी आहे. फोनच्या 12GB+ 512GB व्हेरिएंटची किंमत 1,11,999 रुपये इतकी आहे. हा फोन नेव्ही सिल्वर शॅडो कलर ऑप्शन्ससह उपलब्ध आहे.

तर, Samsung Galaxy S25 Ultra फोनच्या 12GB रॅम+ 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1,29,999 रुपये इतकी निश्चित केली गेली आहे. फोनच्या 12GB 512GB व्हेरिएंटची किंमत 1,41,999 रुपये आहे. तर, फोनच्या टॉप 12GB+ 1TB (टायटॅनियम सिल्व्हरब्लू) व्हेरिएंटची किंमत 1,65,999 रुपये आहे. हा फोन टायटॅनियम सिल्व्हरब्लू, टायटॅनियम ग्रे, टायटॅनियम व्हाइटसिल्व्हर, टायटॅनियम ब्लॅक कलर ऑप्शन्ससह उपलब्ध आहे.
उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, Samsung Galaxy S25 सिरीजचे प्री-बुकिंग देखील सुरू झाले आहे. तर, या फोन्सची विक्री 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या स्मार्टफोन सिरीजबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा!
Samsung Galaxy S25 सिरीजचे प्री-बुकिंग ऑफर्स
Samsung Galaxy S25 वर प्री बुकिंग ऑफर्स सुरु आहेत. अपग्रेड बोनस म्हणून 11,000 रुपये किमतीचे फायदे किंवा 9 महिन्यांच्या नो-कॉस्ट EMI प्लॅन्ससह 7,000 रुपयांचा कॅशबॅक मिळतोय. तर, Galaxy S25+ वर 12,000 रुपयांचे फायदे आहेत. ज्या अंतर्गत ग्राहकांना 12GB+ 256GB व्हेरिएंटच्या किंमतीत 12GB+ 512GB व्हेरिएंट मिळू शकतो. तसेच, Galaxy S25 Ultra फोनवरील प्री बुकिंग ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, 12000 रुपये किमतीचे स्टोरेज अपग्रेड (256GB च्या किमतीत 512GB) आणि 9,000 रुपयांच्या अपग्रेड बोनससह 21,000 रुपयांचे फायदे मिळतील. तसेच, 9 महिन्यांच्या नो कॉस्ट EMI प्लॅनवर 7000 रुपयांचा कॅशबॅक देखील उपलब्ध आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile