Finally! बहुप्रतीक्षित Samsung Galaxy S25 सिरीज लाँच, नव्या स्मार्टफोन्समध्ये काय मिळेल विशेष?
Samsung च्या आगामी Samsung Galaxy S25 सिरीजची प्रतीक्षा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती.
अखेर Samsung ने Samsung Galaxy S25 सिरीज लाँच केली आहे.
या सिरीज अंतर्गत कंपनीने Galaxy S25 Ultra, Galaxy S25+ आणि Galaxy S25 असे तीन स्मार्टफोन्स मॉडेल सादर
साऊथ कोरियाची प्रसिद्ध टेक जायंट Samsung च्या आगामी Samsung Galaxy S25 सिरीजची प्रतीक्षा गेल्या अनेक दिवसांपासून टेक विश्वात सुरु होती. मात्र, अखेर आता Samsung Galaxy Unpacked Event मध्ये कंपनीने आपली नवीनतम स्मार्टफोन सिरीज Samsung Galaxy S25 सिरीज लाँच केली आहे. या सिरीज अंतर्गत कंपनीने Galaxy S25 Ultra, Galaxy S25+ आणि Galaxy S25 असे तीन स्मार्टफोन्स मॉडेल सादर केले आहेत. Galaxy S25 सिरीज ही वापरकर्त्यांना त्यांच्या फोनशी आणि त्यांच्या जगाशी संवाद साधण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणण्याच्या सॅमसंगच्या दृष्टिकोनातील पहिले पाऊल आहे, असे कंपनीने सांगितले आहे. जाणून घेऊयात Samsung Galaxy S25 सिरीजबद्दल संपूर्ण माहिती-
SurveyAlso Read: 12GB RAM Smartphones under 20000: स्वस्त किमतीत Powerful स्पेक्स भारी फोन्स उपलब्ध, पहा यादी

Samsung Galaxy S25 सिरीजची किंमत
Samsung Galaxy S25 सिरीजच्या किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Samsung Galaxy S25 ची सुरुवातीची किंमत $799 इतकी निश्चित करण्यात आली आहे. तर, Samsung Galaxy S25+ फोनची सुरुवातीची किंमत $999 इतकी आहे. तर, Samsung Galaxy S25 Ultra ची किंमत 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटची किंमत $1299 पासून सुरू होते. Samsung Galaxy S25 सिरीजच्या AI फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोन्समध्ये सर्कल टू सर्च, Gemini, कॉल ट्रान्सक्रिप्ट, रायटिंग असिस्ट आणि ड्रॉईंग असिस्ट सारखे फीचर्स उपलब्ध आहेत.
Samsung Galaxy S25 आणि Samsung Galaxy S25+
डिस्प्ले
Samsung Galaxy S25 फोनमध्ये 6.2-इंच लांबीचा FHD+ देण्यात आला आहे. तर, Samsung Galaxy S25+ फोनमध्ये 6.7 इंच लांबीचा QHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा Dynamic AMOLED 2X डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो.
प्रोसेसर
Samsung Galaxy S25 आणि Samsung Galaxy S25+ स्मार्टफोन्स स्पीड आणि मल्टटास्किंगसाठी Qualcomm च्या नवीनतम Snapdragon 8 Elite (Gen 3) प्रोसेसरसह सुसज्ज आहेत.

कॅमेरा
Samsung Galaxy S25 सिरीजच्या या दोन्ही स्मार्ट फोनमध्ये 12MP Ultra-Wide कॅमेरा, 50MP Wide कॅमेरा आणि 10MP टेलेफोटो कॅमेरा आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 12MP चा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे.
बॅटरी
Samsung Galaxy S25 फोनमध्ये 4000mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 25W अॅडॉप्टरसह सुमारे 30 मिनिटांत 50% पर्यंत चार्ज होईल. तर, Samsung Galaxy S25+ फोनमध्ये 4900mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 45W अॅडॉप्टरसह सुमारे 30 मिनिटांत 65% पर्यंत चार्ज होईल.
Samsung Galaxy S25 Ultra

Samsung Galaxy S25 Ultra स्मार्टफोनमध्ये 6.9 इंच लांबीचा QHD+ Dynamic AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटच्या समर्थनासह येतो. फोटोग्राफीसाठी, या स्मार्टफोनमध्ये 50MP Ultra-Wide कॅमेरा, 200 MP Wide कॅमेरा, 5x ऑप्टिकल झूमसह 50MP टेलेफोटो कॅमेरा आणि 3x ऑप्टिकल झूमसह 10MP टेलेफोटो कॅमेरा मिळेल. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 12MP फ्रंट कॅमेरा मिळेल. स्टोरेज सेक्शनबदलद बोलायचे झाल्यास, यात 12GB + 1TB, 12GB+ 512GB, 12GB+ 256GB असे तीन स्टोरेज व्हेरिएंट्स मिळतील. पॉवर बॅकअपसाठी, यात 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 45W अॅडॉप्टरसह सुमारे 30 मिनिटांत 65% पर्यंत चार्ज होईल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile