12GB RAM Smartphones under 20000: स्वस्त किमतीत Powerful स्पेक्स भारी फोन्स उपलब्ध, पहा यादी
12GB रॅमसह 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत भारी स्मार्टफोन्स उपलब्ध
Motorola, Realme आणि Poco स्मार्टफोन्स यादीत समाविष्ट
या फोन्समध्ये बॅटरी, कॅमेरा आणि इतर सर्व जबरदस्त फीचर्स उपलब्ध आहेत.
12GB RAM Smartphones under 20000: प्रसिद्ध इ कॉमर्स Amazon सध्या स्मार्टफोन्सवर अनेक आश्चर्यकारक ऑफर्स देत आहे. ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या 12GB रॅम स्मार्टफोन्सवर भारी सवलत मिळते आहे. तसेच, तुम्हाला कमी किमतीत या फोनसह अनेक पॉवरफुल फीचर्स मिळतात. या फोन्समध्ये बॅटरी, कॅमेरा आणि इतर सर्व जबरदस्त फीचर्स उपलब्ध आहेत. या लेखात आम्ही तुम्हाला Motorola, Realme आणि Poco स्मार्टफोन्सबद्दल माहिती देणार आहोत.
SurveyAlso Read: आकर्षक ट्रान्सपरंट लुकसह येणाऱ्या Nothing फोनवर मिळतोय भारी Discount, तब्बल 8000 रुपयांची सूट
Motorola G64 5G
Motorola G64 5G स्मार्टफोनची किमत Amazon वर फोनची किंमत 17,199 रुपये आहे. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, 12GB रॅम आणि 256GB अंतर्गत स्टोरेज असलेल्या या स्मार्टफोनमध्ये OIS सपोर्टसह 50MP मुख्य कॅमेरा आणि 8MP सेकंडरी सेन्सर आहे. या फोनमध्ये 6.5 इंच फुल एचडी डिस्प्ले आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 16MP फ्रंट कॅमेरा आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा हँडसेट MediaTek Dimensity 7025 प्रोसेसरसह येतो. पॉवर बॅकअपसाठी, या स्मार्टफोनमध्ये 6000mAh बॅटरी आहे.

POCO X6 5G
POCO X6 5G स्मार्टफोनमध्ये 12GB रॅमसह 512GB अंतर्गत स्टोरेज आहे. 12GB रॅम असलेला फोन Amazon वर 18,998 रुपयांना उपलब्ध आहे. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, या हँडसेटमध्ये 120Hz रिफ्रेश रेटचा डिस्प्ले देण्यात आला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या हँडसेट Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर मिळणार आहे. फोटोग्राफीसाठी, डिव्हाइसमध्ये 64MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. हा फोन पाण्याच्या प्रतिकारासाठी IP54 रेटिंगसह येतो.
Realme NARZO 70 Turbo 5G

Realme च्या Realme NARZO 70 Turbo 5G स्मार्टफोनमध्ये 12GB रॅमसह 256GB इंटरनल स्टोरेज आहे. हा फोन Amazon वर 20,998 रुपयांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, फोन डायमेंसिटी 7300 एनर्जी 5G प्रोसेसरसह सुसज्ज आहे. Samsung E4 OLED डिस्प्लेमध्ये 6.67-इंच लांबीचा फुल HD+ आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. Realme या डिस्प्लेला ‘OLED Esports Display’ म्हणतात. पॉवर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile