Google Pixel 9A
Google चा Google Pixel 9a फोन भारतात मागील महिन्यात लाँच करण्यात आला होता. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा पिक्सेल सिरीजमधील एक नवीन आणि परवडणारा स्मार्टफोन आहे. आज म्हणजेच 16 एप्रिल 2025 रोजी या फोनची पहिली सेल आहे, हा फोन आज दुपारी 12 वाजल्यापासून ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर लाईव्ह असेल. या कालावधीत हे उपकरण सवलतीच्या दरात आणि परवडणाऱ्या EMI वर खरेदी करता येईल. जाणून घेऊयात या फोनची किंमत आणि त्यावरील उपलब्ध ऑफर्स-
Also Read: प्रतीक्षा संपली! Motorola Edge 60 Stylus फोन भारतात अखेर लाँच, स्टायलस सपोर्टसह सर्वात स्वस्त फोन
Google Pixel 9a या स्मार्टफोनच्या 8GB+256GB व्हेरिएंटची किंमत 49,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली होती. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोन खरेदी केल्यावर तुम्हाला 3000 रुपयांपर्यंत सूट मिळेल. याव्यतिरिक्त, हँडसेट नो-कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफरवर देखील खरेदी करता येईल. ग्राहकांसाठी या फोनमध्ये आयरिस, ऑब्सिडियन, पियोनी आणि पोर्सिलेन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.
Google Pixel 9a या स्मार्टफोनमध्ये FHD+ 6.3 इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. सुरळीत कामकाजासाठी, या नवीन स्मार्टफोनमध्ये टेन्सर G4 प्रोसेसरसह टायटन M2 चिप उपलब्ध आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, 8GB रॅम आणि 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे. एवढेच नाही तर, तुम्हाला फोनमध्ये क्लाउड स्टोरेज देखील उपलब्ध आहे.
आकर्षक फोटोग्राफीसाठी, कंपनीने या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. या सेटअपमध्ये 48MP चा मुख्य आणि 13MP चा सेकंडरी लेन्स आहे. व्हिडिओ कॉलिंग आणि उत्तम सेल्फीसाठी फोनच्या पुढील बाजूस 13MP फ्रंट कॅमेरा मिळेल. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, स्मार्टफोनमध्ये 5100mAh ची मोठी बॅटरी आहे, जी 23W फास्ट चार्जिंगची सुविधा आहे. चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी, स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम कार्ड स्लॉट, Wi-Fi, GPS, ब्लूटूथ आणि USB टाइप-C पोर्ट आहे.