प्रतीक्षा संपली! Motorola Edge 60 Stylus फोन भारतात अखेर लाँच, स्टायलस सपोर्टसह सर्वात स्वस्त फोन 

प्रतीक्षा संपली! Motorola Edge 60 Stylus फोन भारतात अखेर लाँच, स्टायलस सपोर्टसह सर्वात स्वस्त फोन 
HIGHLIGHTS

Motorola Edge 60 Stylus स्मार्टफोन आज भारतीय बाजारात लाँच

Motorola Edge 60 Stylus हा स्मार्टफोन कंपनीने मिड रेंजमध्ये लाँच केला.

Motorola Edge 60 Stylus ला या सेगमेंटचा पहिला बिल्ट-इन स्टायलस मिळतो.

Motorola चा बहुप्रतीक्षित Motorola Edge 60 Stylus स्मार्टफोन आज भारतीय बाजारात लाँच झाला आहे. हा फोन अनेक आकर्षक फीचर्ससह सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये मोटोरोलाने अनेक AI फीचर्स दिले आहेत. या फोनमध्ये मोठा डिस्प्ले आणि दीर्घकाळ टिकणारी बॅटरी मिळेल. तसेच, या फोनमध्ये तुमचे स्टायलस फोनचा सपोर्ट देखील मिळेल. चला तर मग जाणून घेउयात, या स्मार्टफोनची किंमत, सर्व फीचर्स आणि स्पेक्स-

Also Read: तब्बल 4000 हजार रुपयांच्या सवलतीसह मिळतोय Samsung फोन, 50MP कॅमेरासह 5000mAH बॅटरी उपलब्ध

Motorola Edge 60 Stylus फोनची किंमत

Motorola ने Motorola Edge 60 Stylus हा स्मार्टफोन फक्त एकाच व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये 8GB रॅमसह 256GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या स्मार्टफोनची किंमत कंपनीने 22,999 रुपये इतकी निश्चित केली आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री 23 एप्रिल 2025 रोजी दुपारी 12 वाजता प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर सुरू होईल.

motorola edge 60 stylus

Motorola Edge 60 Stylus चे टॉप फीचर्स आणि स्पेक्स

डिस्प्ले

Motorola Edge 60 Stylus स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच लांबीचा 1.5k रिझोल्यूशनचा pOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. पाणी आणि धूळपासून सुरक्षिततेसाठी या फोनला IP68 रेटिंग देण्यात आले आहे. हा फोन व्हेगन लेदर फिनिशसह येतो.

प्रोसेसर

उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या फोनमध्ये Snapdragon 7s Gen2 प्रोसेसर उपलब्ध आहे. हा प्रोसेसर संतुलित कामगिरी आणि चांगली ऊर्जा कार्यक्षमता देतो, जो दैनंदिन कामांसाठी आणि काही गेमिंगसाठी योग्य आहे.

महत्त्वाचे फीचर्स

Motorola Edge 60 Stylus ला या सेगमेंटचा पहिला बिल्ट-इन स्टायलस मिळतो, जो स्क्रिबलिंग आणि स्केचिंगसाठी वापरला जाऊ शकतो. हा फोन Moto AI सह येतो, Moto AI हा स्मार्टफोनची उपयुक्तता वाढविण्यासाठी मोटोरोलाने सादर केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित फीचर्सचा एक संच आहे. या फीचर्सचा उद्देश कार्ये सुलभ करणे, माहिती आयोजित करणे आणि अधिक वैयक्तिकृत वापरकर्ता अनुभव प्रदान करणे आहे. त्याबरोबरच, हा फोन अँड्रॉइड 15 वर आधारित हॅलो यूआय वर चालतो. त्यात Glance AI देखील उपलब्ध आहे.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी, फोनच्या मागील बाजूस 50MP चा सोनी लिटिया 700C मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय, मागील बाजूस 13MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर उपलब्ध आहे. तसेच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी

Motorola Edge 60 Stylus फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा Motorola फोन 68W टर्बोचार्ज चार्जिंगला सपोर्ट करतो. याव्यतिरिक्त, फोनमध्ये 15W वायरलेस चार्जिंग सपोर्ट आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo