CMF Phone 2 Pro price and features
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता CMF ने अलीकडेच भारतात आपला लेटेस्ट CMF Phone 2 Pro लाँच केला आहे. या फोनची पहिली सेल आज म्हणजेच 5 मे रोजी सुरु होणार आहे. ही सेल ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Flipkart वर दुपारी 12 वाजल्यापासून लाईव्ह होईल. सेलदरम्यान डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफरसह फोन स्वस्तात खरेदी करता येईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, या हँडसेटचा मागील पॅनल बदलता देखील येतो. तर, हँडसेटमध्ये 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी आहे. चला तर मग जाणून घेऊयात फोनची किंमत आणि ऑफर्स-
Also Read: 6000mAh बॅटरी, 200MP कॅमेरा असलेल्या Vivo फोनवर भारी Discount! आकर्षक डील अजिबात चुकवू नका
CMF Phone 2 Pro च्या 8GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 18,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. त्याबरोबरच, या हँडसेटचा 8GB + 256GB स्टोरेज मॉडेल 20,999 रुपयांना उपलब्ध आहे. पहिल्या सेलमधील ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये HDFC, ICICI, HDFC, SBI आणि Axis Bank कडून यावर 1000 रुपयांची सूट दिली जाईल. तसेच, स्वस्त EMI आणि एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध असेल.
CMF चा लेटेस्ट स्मार्टफोन CMF Phone 2 Pro ची डिझाईन अनोखी आहे. या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 6.67 इंच लांबीचा आहे. उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या हँडसेटमध्ये MediaTek Dimensity 7300 Pro चिप उपलब्ध आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 8GB RAM आणि 256 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे. SD कार्डच्या मदतीने स्टोरेज 2TB पर्यंत वाढवता येईल. हा स्मार्टफोन Android 15 वर आधारित Nothing OS 3.2 ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करतो. यात फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
त्याबरोबरच, फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50MP मेन, 50MP टेलिफोटो आणि 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहेत. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या हँडसेटच्या समोर 8MP कॅमेरा आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी 5000mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंगसह येईल. कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये Wi-Fi, GPS, ब्लूटूथ आणि USB टाइप-C पोर्ट सारखे स्पेसिफिकेशन आहेत.