6000mAh बॅटरी, 200MP कॅमेरा असलेल्या Vivo फोनवर भारी Discount! आकर्षक डील अजिबात चुकवू नका 

6000mAh बॅटरी, 200MP कॅमेरा असलेल्या Vivo फोनवर भारी Discount! आकर्षक डील अजिबात चुकवू नका 
HIGHLIGHTS

Vivo ने अलिकडेच Vivo X200 Pro 5G फोन भारतीय बाजारात लाँच केला.

Vivo X200 Pro 5G स्मार्टफोनवर सध्या मोठ्या प्रमाणात डिस्काउंट उपलब्ध

या स्मार्टफोनमध्ये 200MP कॅमेरा आणि 6000mAh बॅटरीसारखे पॉवरफुल फीचर्स मिळतील.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo ने अलिकडेच Vivo X200 Pro 5G फोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. या स्मार्टफोनवर सध्या मोठ्या प्रमाणात डिस्काउंट ऑफर केला जात आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा कंपनीचा नवीनतम प्रीमियम स्मार्टफोन आहे. विशेष स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 200MP कॅमेरा आणि 6000mAh बॅटरीसारखे पॉवरफुल फीचर्स मिळतील. चला तर मग जाणून घेऊयात Vivo X200 Pro 5G ची किंमत आणि स्पेक्स-

Also Read: आगामी Realme GT 7 चे भारतात लाँचिंग कन्फर्म! पॉवरफुल बॅटरीसह मिळतील अनेक आकर्षक फीचर्स

Vivo X200 Pro 5G ची किंमत आणि ऑफर्स

Vivo X200 Pro 5G स्मार्टफोनची किंमत Amazon वर 94,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या किमतीत तुम्हाला फोनचा 16GB रॅम आणि 512GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंट मिळेल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन टायटॅनियम ग्रे आणि कॉसमॉस ब्लॅक कलर ऑप्शन्ससह खरेदी करता येईल. SBI आणि HDFC बँक विवोच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनवर 7000 रुपयांची मोठी सूट देत आहेत. ही ऑफर क्रेडिट कार्डद्वारे घेता येईल. याशिवाय, हँडसेटवर 74,850 रुपयांचा एक्सचेंज आणि 3,958 रुपयांचा EMI दिला जात आहे.

vivo x200 pro 5g

Vivo X200 Pro 5G चे फीचर्स आणि स्पेक्स

Vivo X200 Pro 5G फोनमध्ये 6.78-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याबरोबरच, या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देखील उपलब्ध आहे. उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, Vivo X200 Pro स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 9400 चिप आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज देखील मिळेल. चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी, विवोच्या महागड्या स्मार्टफोनमध्ये Wi-Fi, GPS, ब्लूटूथ, ऑडिओ जॅक, ड्युअल सिम कार्ड स्लॉट, NFC आणि USB टाइप-C पोर्ट आहे.

आकर्षक फोटोग्राफीसाठी, या Vivo X200 Pro फोनमध्ये 50MP, 50MP आणि 200MP लेन्स मिळतील. त्याबरोबरच, या लेन्ससह तुम्हाला फ्लॅश लाईट देखील मिळणार आहे. या कॅमेरा द्वारे उच्च-रिझोल्यूशन व्हिडिओ रेकॉर्ड केले जाऊ शकतात. कंपनीने व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फी क्लिक करण्यासाठी फोनमध्ये 32MP कॅमेरा दिला आहे. त्याबरोबरच, यात पोर्ट्रेट, फोटो, व्हिडिओ, पॅनो, अल्ट्रा एचडी, स्लो-मो, टाइम-लॅप्स आणि प्रो असे अनेक कॅमेरा मोड मिळतील. पॉवर बॅकअपसाठी, फोनमध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी आहे, ज्यामध्ये 90W फ्लॅश चार्ज आणि 30W वायरलेस फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo