Vivo V40e 5G with 50MP Selfie camera
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo चा Vivo V50e 5G फोन भारतात नुकतेच लाँच करण्यात आला आहे. हा फोन कंपनीने मिड रेंजमध्ये सादर करण्यात आला आहे. या मोबाईलच्या आगमनाने कंपनीच्या जुन्या Vivo V40e 5G मोबाईलचे दर खूपच कमी झाले आहेत. हा Vivo 5G फोन देखील 28,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता. मात्र, हा फोन मोठ्या सवलतीसह उपलब्ध आहे. चला तर मग जाणून घेऊयात Vivo V40e 5G फोनवरील किंमत आणि डिस्काउंट-
Also Read: नव्या Lumio ने लाँच केले नवे मोठे Smart TV! किंमत फक्त 30,000 रुपयांपासून सुरु
Vivo V40e चा 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 28,999 रुपयांना लाँच करण्यात आला. हा फोन 2000 रुपयांच्या सवलतीसह सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर 2000 रुपयांच्या सवलतीसह फ्लिपकार्टवर 1500 रुपयांची क्रेडिट कार्ड ऑफर देखील मिळत आहे. HDFC, SBI आणि Axis बँक क्रेडिट कार्ड वापरून EMI केल्यास 1500 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल.
अशाप्रकारे, तुम्हाला या फोनवर 3500 रुपयांच्या सवलतीसह खरेदी करता येईल. ही ऑफर केवळ या महिन्यापर्यंत मर्यादित आहे. येथून खरेदी करा!
Vivo V40e स्मार्टफोन 6.77-इंच लांबीच्या फुल HD+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हे देखील एक 3D कर्व AMOLED स्क्रीन आहे, जे 120Hz रिफ्रेश रेटसह सपोर्ट करेल. उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंग प्रोसेसिंगसाठी, या 5G Vivo फोनमध्ये MediaTek Dimensity 7300 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याबरोबरच, या फोनमध्ये 8GB रॅम आणि एक्सटेंडेड रॅम टेक्नॉलॉजी आहे. या तंत्रज्ञानामुळे फोनच्या 8GB फिजिकल रॅममध्ये 8GB व्हर्च्युअल रॅम मिळेल.
Vivo V40e मध्ये फोटोग्राफीसाठी फोनच्या ड्युअल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 50MP सोनी IMX882 सेन्सर आहे. हा सेन्सर 8MP अल्ट्रा वाइड-अँगल लेन्ससह एकत्रितपणे कार्य करतो. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 50MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी मिळेल, जी 80W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह मिळत आहे.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.