स्वस्तात मिळतोय ‘हा’ Samsung फोन, 64GB व्हेरिएंट ₹749 मध्ये तर 128GB व्हेरिएंट ₹999 मध्ये खरेदी करा

Updated on 01-Jul-2022
HIGHLIGHTS

फ्लिपकार्टवर Samsung Galaxy F13 स्वस्त किमतीत उपलब्ध

सेल अंतर्गत, 64GB व्हेरिएंट ₹749 मध्ये खरेदी करता येईल

तर, 128GB व्हेरिएंट ₹999 मध्ये खरेदी करण्याची संधी

जर तुम्हाला कमी बजेटमध्ये हेवी रॅम आणि मोठी बॅटरी असलेला फोन हवा असेल, तर आज आम्ही तुम्हाला एका उत्तम डीलबद्दल सांगणार आहोत. खरं तर, सॅमसंगचा नवीनतम स्मार्टफोन Samsung Galaxy F13 सध्या फ्लिपकार्टवर 1 ते 1 जुलै दरम्यान चालणाऱ्या बिग बचत धमाल सेलमध्ये मोठ्या सवलतींसह उपलब्ध आहे. फोनमध्ये 6000 mAh बॅटरी आणि 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. चला या डीलबद्दल सविस्तर जाणून घेऊया… 

हे सुद्धा वाचा : सोनिया अयोध्या 'BIGG BOSS 16' मध्ये येणार? जाणून घ्या आतापर्यंत 'या' यादीत सामील झालेली नावे

अशाप्रकारे फोन 1000 रुपयांच्या खाली खरेदी करा

 फ्लिपकार्ट लिस्टिंगनुसार, Galaxy F13 च्या 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे, जो केवळ 11,999 रुपयांमध्ये 20% डिस्काउंटसह उपलब्ध आहे. तसेच, फोनच्या 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे, जी 23% डिस्काउंटसह फक्त 12,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. दोन्ही व्हेरिएंटमध्ये 4GB RAM आहे. फोनवर उपलब्ध असलेल्या बँकिंग ऑफर आणि एक्सचेंज बोनसमुळे फोनच्या किंमतीत लक्षणीय घट झाली आहे.

फोनच्या 64GB स्टोरेज वेरिएंटमध्ये 11,250 रुपयांचा तर 128GB स्टोरेज वेरिएंटला 12,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळत आहे. म्हणजेच, पूर्ण एक्सचेंज बोनस मिळाल्यास, 64GB स्टोरेज व्हेरिएंट फक्त 749 रुपये (₹11,999-₹11,250) आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट फक्त 999 रुपये (₹12,999-₹12,000) मध्ये खरेदी केले जाऊ शकते. मात्र , एक्सचेंज करण्यासाठी फोनची कंन्डिशन व्यवस्थित असायला हवी. 

फोनचे फीचर्स

नुकताच लाँच झालेला Samsung Galaxy F13 स्मार्टफोन 4GB रॅम, 128GB पर्यंत स्टोरेज, 6.6-इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले, 50-मेगापिक्सेल ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप, 6000mAh बॅटरीसह येतो. त्याचे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते. 

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :