सोनिया अयोध्या 'BIGG BOSS 16' मध्ये येणार? जाणून घ्या आतापर्यंत 'या' यादीत सामील झालेली नावे

ने Reshma Zalke | वर प्रकाशित 01 Jul 2022
HIGHLIGHTS
  • BIGG BOSS 16 शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

  • संभाव्य स्पर्धकांची यादी तयार

  • यादीमध्ये अभिनेत्री सोनिया अयोध्याचे नाव असल्याचे वृत्त

सोनिया अयोध्या 'BIGG BOSS 16' मध्ये येणार? जाणून घ्या आतापर्यंत 'या' यादीत सामील झालेली नावे
सोनिया अयोध्या 'BIGG BOSS 16' मध्ये येणार? जाणून घ्या आतापर्यंत 'या' यादीत सामील झालेली नावे

BIGG BOSS 16 च्या स्पर्धकांच्या संदर्भात पुन्हा एकदा गॉसिप कॉरिडॉरमध्ये चर्चा सुरू झाली आहे. शोच्या या सीझनसाठी अनेक स्पर्धकांची नावे चर्चेत आहेत. असेच एक नाव म्हणजे 'सोनिया अयोध्या'. कसौटी जिंदगी की 2 मध्ये सोनियाने तन्वी बजाजची भूमिका साकारली आहे. या शोमध्ये ती एका ग्लॅमरस आणि श्रीमंत महिलेच्या भूमिकेत होती. तिचे पात्र लोकांना खूप आवडले होते. आता बिग बॉस 16 साठी सोनियाला अप्रोच करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. याशिवाय आणखी बरीच प्रसिद्ध नावं समोर येत आहेत, ज्यामध्ये शाइनी आहुजाही एक आहे.
 
 हे सुद्धा वाचा : स्पॅम कमेंट्स बंद करण्यासाठी YouTube वर येणार एक नवीन फिचर, वाचा संपूर्ण तपशील

सोनिया अयोध्याच्या नावाची चर्चा

बिग बॉस 16 शी संबंधित बातम्या ट्रेंडमध्ये येत आहे. 'कसौटी जिंदगी की 2' मालिकेतील अभिनेत्री सोनिया अयोध्या बिग बॉसमध्ये धमाल करण्यासाठी येऊ शकते, अशा बातम्या यापूर्वी आल्या होत्या. सीझन 15 ची सुरुवात चांगल्या TRP ने झाली. पुढे लोकांची आवड हळूहळू कमी होऊ लागली. लोकांचे मनोरंजन करू न शकल्याने सलमान खानने स्पर्धकांना खूप फटकारले होते. यावेळी टीव्हीवरील काही प्रसिद्ध चेहऱ्यांसोबत वादग्रस्त स्पर्धकांना शोमध्ये सहभागी करून घेण्यासाठी निर्माते सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

या सेलिब्रिटींची नावे यादीत आहेत

मिळालेल्या माहितीनुसार, शोसाठी आतापर्यंत दिव्यांका त्रिपाठी, अर्जुन बिजलानी, सनाया इराणी आणि शाइनी आहुजा या कलाकारांना अप्रोच करण्यात आले आहे. गेल्या सिझनची विजेती अभिनेत्री तेजस्वी प्रकाश होती. तिच्यासोबत करण कुंद्रा, उमर रियाज, शमिता शेट्टी, निशांत, प्रतीक, जय भानुशाली, सिम्बा नागपाल, राजीव अडातिया यांसारखे स्पर्धक देखील होते. राखी सावंत आणि तिचा कथित पती रितेश यांनीही शोमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. दरम्यान,  प्रेक्षकांना आता शोच्या पुढील सिझनची प्रतीक्षा आहे. 

Reshma Zalke
Reshma Zalke

Email Email Reshma Zalke

Follow Us Facebook Logo Facebook Logo Facebook Logo

About Me: Marathi Content Editor. This Is My First Time To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. I Also love to write on different topics and reading books. Read More

Tags:
BIGG BOSS 16 BIGG BOSS 14 WINNER BIGG BOSS 15 FINALIST
Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

LATEST ARTICLES सर्व पहा

Advertisements
DMCA.com Protection Status