फक्त 749 रुपयांमध्ये खरेदी करा Redmi 5G स्मार्टफोन, जाणून घ्या आकर्षक ऑफर

फक्त 749 रुपयांमध्ये खरेदी करा Redmi 5G स्मार्टफोन, जाणून घ्या आकर्षक ऑफर
HIGHLIGHTS

केवळ 749 रुपयांमध्ये मिळेल Redmi 5G स्मार्टफोन.

फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक सेलमध्ये अनेक 5G स्मार्टफोन्सवर आकर्षक ऑफर्स.

फ्लिपकार्टवर Redmi Note 10T 5G एकूण 5 हजार रुपयांची सूट.

ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वर इलेक्ट्रॉनिक्स डे सेल सुरु झाला आहे. हा सेल 24 मे पासून सुरु झाला असून 29 मे पर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये तुम्हाला अनेक महागड्या स्मार्टफोनवर प्रचंड सूट मिळत आहे. सेलमध्ये 5G स्मार्टफोन्स देखील अत्यंत किफायतशीर दरात मिळत आहेत. भारतात लवकरच 5G सेवा सुरू होणार आहे, त्यामुळे लोकांचा कल 5G फोनकडे वाढताना दिसत आहे. अनेक मोठ्या स्मार्टफोन निर्माता कंपन्यांनी 5G स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. Flipkart सेलमध्ये 5G स्मार्टफोन अतिशय स्वस्तात खरेदी करता येतात. 17 हजार रुपये किमतीचा Redmi Note 10T 5G फक्त 749 रुपयांना मिळू शकतो. चला तर मग जाणून घेऊयात आकर्षक ऑफर…

Redmi Note 10T 5G 4 GB RAM + 64 GB स्टोरेज वेरियंटची लाँचिंग किंमत 16,999 रुपये आहे. परंतु फ्लिपकार्टवर हा फोन 11,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या फोनवर एकूण 5 हजार रुपयांची सूट मिळत आहे. फोनवर एक्सचेंज ऑफर देखील आहे, ज्यामुळे फोनची किंमत हजार रुपयांपेक्षा कमी होईल.
Redmi Note 10T 5G वर 11,250 रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे. जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केलात तर तुम्हाला एवढी प्रचंड सूट मिळेल. परंतु तुमचा जुना फोन चांगल्या स्थितीत असेल आणि लेटेस्ट मॉडेल असेल तरच 11,250 रुपयांची सूट मिळणार आहे. त्यानंतर जर तुम्ही फुल ऑफ मिळवू शकलात तर फोनची किंमत 749 रुपये होईल.

Redmi Note 10T 5G चे स्पेसिफिकेशन्स 

Redmi Note 10 मध्ये 6.5-इंच लांबीचा FHD + AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. फोन MediaTek Dimensity 700 प्रोसेसरने सुसज्ज आहे. हा फोन Android 11 वर आधारित MIUI12 कस्टम स्किनसह येतो. Redmi Note 10T 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 48MP प्रायमरी कॅमेरा, 2MPचा डेप्थ आणि 2MPचा मॅक्रो सेन्सर आहे. त्याबरोबरच, फोनमध्ये आकर्षक सेल्फीसाठी 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo