जर तुम्ही देखील सवलतीसह ऑनलाईन शॉपिंग करण्यासाठी इच्छुक असाल तर, Amazon Great Republic Day Sale 2025 चा उद्या शेवटचा दिवस आहे. जर तुम्ही अद्याप या सेलचा लाभ घेतला नसेल, तर तुम्हाला आता घाई करावी लागेल. ही वार्षिक सेल गॅझेट्सपासून ते घरगुती उपकरणांपर्यंत सर्व गोष्टींवर सवलतींचा खजिना आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला OnePlus च्या फोल्डेबल स्मार्टफोन OnePlus Open वरील भारी डील्सबद्दल सांगणार आहोत. जेणेकरून तुम्हाला यावर हजारो रुपयांची सूट घेता येईल. पहा ऑफर-
Also Read: Amazon Republic Day Sale 2025 मध्ये स्मार्टवॉचेसवर मिळतायेत सर्वोत्तम डील्स, पहा संपूर्ण यादी
OnePlus Open फोनचा 16GB + 512GB व्हेरिएंट सुरवातीला 1,39,999 रुपयांना लाँच केला गेला. वनप्लस ओपन आता Amazon वर फक्त 99,998 रुपयांना उपलब्ध आहे. या लक्षणीय किमतीतील घसरणीमुळे फोल्डेबल फ्लॅगशिप नेहमीपेक्षा अधिक प्रवेशयोग्य बनले आहेत. कारण तुम्हाला या फोनवर तब्बल 40,000 रुपयांचा ऑफ मिळेल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, SBI क्रेडिट कार्ड व्यवहारांवर तुम्हाला 1000 रुपयांपर्यंतची सूट देखील मिळू शकते. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
OnePlus Open फोल्डेबल फोनमध्ये 7.8 इंच लांबीचा मुख्य डिस्प्ले आहे, जो 120Hz पर्यंत रिफ्रेश रेटसह येतो. त्याबरोबरच, यात 6.31 इंच लांबीचा कव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. हा एक अतिशय चांगला प्रोसेसर आहे, जो सध्या बाजारात सर्वोत्तम परफॉर्मन्स चिपसेटपैकी एक मानला जातो. जो उत्कृष्ट कामगिरी, पॉवर कार्यक्षमता, ऍडव्हान्स AI क्षमता आणि हाय लेव्हल कनेक्टिव्हिटी फिचर देतो. ज्यामुळे तो स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी आणि विशेषतः गेमर्ससाठी आदर्श बनतो.
फोटोग्राफीबद्दल बोलायचे जलायस, OnePlus Open मध्ये AI ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 48MP चा मुख्य कॅमेरा, 64MP चा टेलिफोटो लेन्स आणि 48MP चा अल्ट्रावाइड लेन्स आहे. यात दोन सेल्फी कॅमेरे, 20MP चा मुख्य डिस्प्ले आणि 32MP चा कव्हर स्क्रीनवर सेल्फी शूटर आहे. पॉवर बॅकअपसाठी, OnePlus Open मध्ये 67W चार्जिंग सपोर्टसह 4,805 mAh बॅटरी देण्यात आली आहे.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.