50MP कॅमेरासह लेटेस्ट OnePlus 12 स्मार्टफोन सवलतीसह खरेदी करण्याची संधी, बघा Best ऑफर्स। Tech News

Updated on 09-May-2024
HIGHLIGHTS

OnePlus 12 सिरीज कंपनीने अलीकडेच भारतीय बाजारात सादर केली.

HDFC बँकेच्या कार्डद्वारे पेमेंट केल्यास स्मार्टफोनवर सूट उपलब्ध

OnePlus 12 स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर मिळतो.

फ्लॅगशिप किलर OnePlus ने मागील जानेवारी महिन्याच्या अखेरीस आपली नवीनतम स्मार्टफोन सिरीज लाँच केली. होय, OnePlus 12 सिरीज कंपनीने अलीकडेच भारतीय बाजारात सादर केली आहे. OnePlus च्या चाहत्यांना जर हा नवीन फोन खरेदी करायचा असेल तर, तुमच्यासाठी हीच योग्य वेळ आहे. कारण, Amazon वर हा स्मार्टफोन्स आकर्षक ऑफर्ससह उपलब्ध आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात ऑफर्स-

हे सुद्धा वाचा: Motorola Edge 50 Fusion ची भारतीय लाँच डेट जाहीर! तुमच्या बजेटमध्ये असेल का किंमत? Tech News

OnePlus 12

OnePlus 12 ची किंमत

OnePlus 12 स्मार्टफोनची Amazon वर 64,999 रुपयांना सूचिबद्ध आहे. सध्या Amazon वरून हा स्मार्टफोन खरेदी केल्यास तुम्हाला 2000 रुपयांची सूट मिळत आहे. मात्र, लक्षात घ्या की, ही ऑफर HDFC बँकेच्या कार्डद्वारे पेमेंट केल्यावरच तुम्हाला मिळेल. तुम्ही हा फोन EMI ऑप्शन्ससह देखील खरेदी करू शकता, जो 3,151 रुपयांपासून सुरु होतो.

त्याबरोबरच, तुम्हाला एक्सचेंज ऑफर अंतर्गत 44,250 रुपयांचा ऑफ देखील मिळू शकतो. मात्र, यासाठी तुमचा फोन उत्तम स्थितीत हवा. हा फोन तुम्हाला फ्लॉई एमराल्ड आणि सिल्की ब्लॅक या दोन कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करता येईल. येथून खरेदी करा

OnePlus 12

OnePlus 12 चे फीचर्स आणि स्पेक्स

OnePlus 12 स्मार्टफोनमध्ये 6.82-इंच लांबीचा ProXDR डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, OnePlus 12 च्या या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर मिळतो. Qualcomm Snapdragon 8 Gen 3 वर वापरकर्त्यांना 240fps गेमसाठी सपोर्ट मिळेल. त्याबरोबरच, यूजर्सना अनेक नवीन AI पॉवर्ड कॅमेरा फीचर्स मिळतील. या चिपमध्ये व्हिडिओ ऑब्जेक्ट इरेजर फिचर देखील आहे. हा फोन Android 14 वर आधारित OxygenOS 14.0 वर चालतो.

फोटोग्राफीसाठी, फोनच्या मागील बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 50MP Sony चा LYT-808 कॅमेरा, 64MP 3X पेरिस्कोप कॅमेरा आणि 48MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आहे. OnePlus च्या या फ्लॅगशिप फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात ड्युअल व्ह्यू व्हिडिओ आणि सेल्फी HDR सारखे कॅमेरा फीचर्स देखील आहेत. या स्मार्टफोनमध्ये 5400mah ड्युअल सेल बॅटरी आहे, जी 50W AIRVOOC आणि 100W SUPERVOOC चार्जिंग सपोर्टसह येईल.

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :