Motorola Edge 50 Fusion ची भारतीय लाँच डेट जाहीर! तुमच्या बजेटमध्ये असेल का किंमत? Tech News  

Motorola Edge 50 Fusion ची भारतीय लाँच डेट जाहीर! तुमच्या बजेटमध्ये असेल का किंमत? Tech News  
HIGHLIGHTS

आगामी स्मार्टफोन Motorola Edge 50 Fusion भारतात लाँच होणार

स्मार्टफोनची विक्री Flipkart आणि रिटेल स्टोअरद्वारे केली जाईल.

स्मार्टफोनची मायक्रोसाइट शॉपिंग वेबसाइट Flipkart वर देखील लाइव्ह झाली आहे.

Motorola चा आगामी स्मार्टफोन Motorola Edge 50 Fusion भारतात लाँच होणार आहे. या स्मार्टफोनच्या लाँचची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु आहे. अखेर या स्मार्टफोनची लाँच डेट देखील जाहीर करण्यात आली आहे. स्मार्टफोनची मायक्रोसाइट शॉपिंग वेबसाइट Flipkart वर देखील लाइव्ह झाली आहे. स्मार्टफोनच्या फीचर्सची माहिती साइटवरून देखील प्राप्त झाली आहे. चला तर मग जाणून घेऊयात Motorola Edge 50 Fusion चे भारतीय लॉन्चिंग डिटेल्स-

Motorola Edge 50 Fusion चे भारतीय लॉन्चिंग

Motorola च्या मते, Motorola Edge 50 Fusion 16 मे रोजी लाँच होईल. स्मार्टफोनची विक्री Flipkart आणि रिटेल स्टोअरद्वारे केली जाईल. हे Xiaomi, Vivo, Oppo, Redmi आणि Samsung सारख्या कंपन्यांच्या फोनशी जबरदस्त स्पर्धा करणार आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो की, Motorola Edge 50 Fusion च्या किंमतीबाबत मोटोरोलाने अद्याप कोणतेही अपडेट दिलेले नाही. पण, या फोनची किंमत 31,000 ते 32,000 रुपयांच्या दरम्यान असेल, असे मानले जाते.

Motorola Edge 50 Fusion

Motorola Edge 50 Fusion स्मार्टफोनमध्ये कर्व डिस्प्ले असेल, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz आहे. प्रोटेक्शनसाठी यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 उपलब्ध आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या नवीन स्मार्टफोनमध्ये Qualcomm चा Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर प्रदान केला जाईल. फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP मुख्य सेन्सर आणि 13MP अल्ट्रा-वाइड लेन्स आहे.

Moto Edge 50 Fusion India launch teased: Here's what to expect

याव्यतिरिक्त, फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देखील असेल, जी 68W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनला IP68 रेटिंग देखील मिळाली आहे. याशिवाय हँडसेटमध्ये Wi-Fi, GPS, ब्लूटूथ, USB टाइप-C पोर्ट आणि ऑडिओ जॅक सारखे फीचर्स असतील. मात्र, फोनचे संपूर्ण कन्फर्म फीचर्स फोन लाँच झाल्यावरच पुढे येतील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo