Motorola Edge 50 Fusion लवकरच भारतात होणार लाँच, टीझर Video मध्ये बघा पहिली झलक। Tech News 

Motorola Edge 50 Fusion लवकरच भारतात होणार लाँच, टीझर Video मध्ये बघा पहिली झलक। Tech News 
HIGHLIGHTS

Motorola कंपनी लवकरच भारतात नवीन फोन लाँच करणार

कंपनीने काही काळापूर्वी ग्लोबल मार्केटमध्ये Motorola Edge 50 सीरीज लॉन्च केली.

हा फोन नुकताच 'Coming Soon' टॅगसह टीज करण्यात आला आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Motorola कंपनी लवकरच भारतात नवीन फोन लाँच करणार आहे. कंपनीने आपल्या अधिकृत X (Twitter) द्वारे ही माहिती दिली आहे. सध्या कंपनीकडे फोनचे नाव आणि लाँच डेटबद्दल माहिती नाही. मात्र, कंपनी Motorola Edge 50 सिरीजचा एक व्हेरिएंट आणू शकते, असे बोलले जात आहे. Motorola India ने त्याच्या अधिकृत X हँडलवर एक टीझर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नवीन स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची पुष्टी करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा: Airtel Best Plan: तब्बल 210GB डेटासह मिळतोय Amazon Prime Video सबस्क्रिप्शन अगदी Free

तुमच्या माहितीसाठी सांगतो की, कंपनीने काही काळापूर्वी ग्लोबल मार्केटमध्ये Motorola Edge 50 सीरीज लॉन्च केली आहे. या मालिकेत कंपनीने Motorola Edge 50 Pro, Motorola Edge 50 Ultra आणि Motorola Edge 50 Fusion हे तीन फोन सादर केले होते.

Motorola च्या आगामी स्मार्टफोनचे भारतीय लाँच

वर सांगितल्याप्रमाणे, कंपनीने अद्याप फोनचे नाव आणि लाँच तारखेची पुष्टी केलेली नाही. हा फोन नुकताच ‘Coming Soon’ टॅगसह टीज करण्यात आला आहे. होय, टीझर व्हिडिओमध्ये फोनची पहिली झलक पाहायला मिळाली आहे. याशिवाय लाँचपूर्वी फोनचे काही फीचर्स देखील समोर आले आहेत.

टीझर Video मध्ये तुम्ही बघू शकता की, ‘Fusion’ शब्दाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानुसार, आगामी फोन Motorola Edge 50 Fusion असू शकतो, असा अंदाज लावला जात आहे. याशिवाय, टीझर व्हिडिओमध्ये हे समोर आले आहे की, हा फोन 50MP बॅक कॅमेरासह येणार आहे. ज्यामध्ये सेल्फी कॅमेरासाठी पंच-होल कटआउट प्रदान केला जाईल. तसेच, फोनमध्ये ब्लू कलर ऑप्शन येणार, असे देखील व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Motorola Edge 50 Fusion

Motorola Edge 50 Fusion मध्ये 6.7-इंच लांबीचा फुल HD+ poOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 144Hz इतका आहे. सुरळीत कामकाजासाठी, फोन Qualcomm Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये OIS सपोर्टसह 50MP प्रायमरी कॅमेरा आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 68W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo