Flipkart वर सध्या Flipkart Big Bachat days sale सुरु आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, आज या सेलचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे जर तुम्हाला Flipkart वरून पारदर्शक लुक Nothing Phone 2 खरेदी करायचा असेल तर हीच योग्य वेळ आहे. कारण या फोनवर तुम्हाला तब्बल 12000 रुपयांचा डायरेक्ट डिस्काउंट मिळत आहे. जाणून घेऊयात सविस्तर-
Nothing Phone (2) च्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत Flipkart वर 49,999 रुपये आहे. मात्र, फ्लिपकार्ट बिग बचत डेज सेल दरम्यान Nothing Phone (2) वर 12,000 रुपयांची सूट मिळत आहे. डिस्काउंटनंतर, हे मॉडेल केवळ 37,999 रुपयांमध्ये खरेदी केले जाऊ शकते. त्याबरोबरच, अनेक ऑफर्स देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. निवडक बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 2000 रुपयांची सवलत मिळेल. तर, Flipkart Axis बँक कार्डद्वारे 5% कॅशबॅक देखील उपलब्ध आहे. येथून खरेदी करा
Nothing Phone (2) चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Nothing Phone (2) मध्ये 6.7 इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले आहे. याचे रिझोल्यूशन 2412 x 1080 पिक्सेल आहे. या फोनमध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. स्ट्रेवोज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB आणि 512GB पर्यंत स्टोरेज उपलब्ध आहे.
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे, ज्यामध्ये OIS सपोर्ट उपलब्ध आहे. तर, 50MP सेकंडरी कॅमेरा आहे. या लेन्ससोबत तुम्ही उत्तम प्रतीचे फोटोज क्लिक करण्यास सक्षम असाल. तसेच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये मध्ये 4700mAh बॅटरी देण्यात आलेली आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile