iPhone लव्हर्स! या सणासुदीच्या काळात तुम्हाला नवीन iPhone घ्यायचा असेल तर? तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. Amazon चा GIF सेलचा दुसरा फेज म्हणजेच Extra Happiness Days सुरु झाले आहेत. यंदा तुम्ही Amazon India वरून अत्यंत स्वस्त किंमतीत iPhone 13 खरेदी करू शकता. लक्षात घ्या, केवळ Amazon च नाही तर अनेक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर हा फोन सध्या स्वस्तात विकत आहेत.
Survey
✅ Thank you for completing the survey!
Amazon Festival Sale मध्ये हा फोन विकत घ्यायचा असेल तर तुम्हाला एक नवीन बँक ऑफर दिली जात आहे. बँक ऑफर, एक्सचेंज ऑफर आणि डिस्काउंटनंतर Amazon सेलमध्ये iPhone 13 ची किंमत किती होईल, ते सविस्तर बघुयात.
सध्या Amazonवर iPhone 13 च्या 128GB मॉडेलवर अप्रतिम डील दिली जात आहे. iPhone 13 सध्या 15% डिस्काउंटसह विकला जात आहे. यासह फोनची किंमत फक्त 50,999 रुपये राहिली आहे. होय, या स्मार्टफोनची खरी किंमत सुमारे 59,900 रुपये आहे. चला तर मग iPhone 13 वरील उपलब्ध सर्व ऑफर्सबद्दल जाणून घेऊयात.
iPhone 13 चे सेल ऑफर्स
iPhone 13 वरील उपलब्ध बँक ऑफर्स बद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही SBI बँक ऑफरऐवजी Amazon सेलमध्ये OneCard क्रेडिट कार्ड EMI द्वारे व्यवहार करून सुमारे 10% म्हणजेच 1000 रुपयांची बचत करू शकता. जर तुमच्याकडे एक्सचेंज साठी जुना फोन असेल, तर तुम्ही सध्या हा फोन 45,000 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज ऑफरसह खरेदी करू शकता. मात्र, लक्षात घ्या की, या ऑफरसाठी तुमचा जुना फोन चांगल्या स्थितीत असणे खूप महत्वाचे आहे. Buy From Here
iPhone 13 चे मुख्य तपशील
iPhone 13 स्मार्टफोनमध्ये 6.1-इंच लांबीचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले मिळेल. अप्रतिम कार्यप्रदर्शनासाठी या फोनमध्ये A15 Bionic चिप आहे. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, यात 12MP वाईड आणि 12MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. या मुख्य आणि आकर्षक फीचर्ससह हा iPhone लोकप्रिय iPhone म्हणून झाला आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile