Google ने मागील वर्षी आपला नवा स्मार्टफोन Google Pixel 8 लाँच केला होता. सध्या हा फोन भारी सवलतीसह विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. होय, हा फोन Flipkart वर तब्बल 31,000 रुपयांच्या थेट घसरणीसह उपलब्ध करून देण्यात आला आहे. ही ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध असणार आहे. हा फोन 50MP मेन कॅमेरा आणि मोठ्या बॅटरीसह येतो. चला तर मग जाणून घेऊयात Google Pixel 8 ची किंमत आणि आणि सवलती-
Also Read: Price Drop! OnePlus 13 सिरीजसह अनेक डिवाइस होणार स्वस्त, जबरदस्त सेल सुरु
किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Google Pixel 8 फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत फ्लिपकार्टवर 75,999 रुपये आहे. मात्र, तुम्ही हा फोन आत्ता स्वस्तात खरेदी करू शकता. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, सध्या फोनचा हा व्हेरिएंट फ्लिपकार्टवरून 31,000 रुपयांच्या डिस्काउंटसह 44,999 रुपयांना खरेदी करता येईल. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
Google Pixel 8 मध्ये 6.2-इंच लांबीचा फुल HD+ OLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 2400x 1080 पिक्सेल आहे. उत्तम परफॉर्मन्ससह स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये Tensor G3 प्रोसेसर देण्यात आला आहे. सुरक्षेसाठी Titan M2 चिप देखील देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, पाण्यापासून संरक्षणासाठी फोनला IP68 रेटिंग मिळाले आहे.
त्याबरोबरच, या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये प्रायमरी कॅमेरा 50MP चा आहे. तसेच, तुम्हाला या सेटअपमध्ये 12MP चा सेकेंडरी कॅमेरा देखील मिळेल. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 10.5MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी, फोनची बॅटरी 4575mAh आहे. हा फोन एकदा चार्ज केल्यानंतर 72 तासांपर्यंत पॉवर देईल.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.