vivo y300 plus 5g
जर तुम्ही देखील सेल्फीचे शौकीन असाल आणि नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यास इच्छुक असाल तर, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. कारण या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला बाजारात शीर्षस्थानी असलेल्या कंपनीच्या Vivo स्मार्टफोनबद्दल माहिती देणार आहोत. कंपनी 32MP सेल्फी कॅमेरासह Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन ऑफर करते. सेल्फीच्या शौकीन लोकांसाठी हा कॅमेरा सर्वोत्तम मानला जातो. हा फोन कंपनीने मिड बजेट रेंजमध्ये सादर केला आहे. सध्या हा फोन Flipkart वर मोठ्या सवलतींसह उपलब्ध करून देण्यात आला आहे. चला तर मग जाणून घेऊयात Vivo Y300 Plus 5G ची किंमत आणि ऑफर्स-
Vivo Y300 Plus 5G फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत Flipkart वर 29,999 रुपये इतकी आहे. सध्या फ्लिपकारात वरून तुम्ही हा फोन स्वस्तात खरेदी करू शकता. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास,.Vivo Y300 Plus 5G फोन आत्ताच Flipkart वरून 6000 रुपयांच्या सवलतीसह 23,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. याव्यतिरिक्त, बँक कार्डद्वारे 2000 रुपयांची अतिरिक्त सूट उपलब्ध असेल. लक्षात घ्या की, सवलतीच्या ऑफर्स जवळपास बदलत राहू शकतात.
Vivo Y300 Plus 5G फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा AMOLED कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरद्वारे सुसज्ज आहे. तसेच, हा फोन अँड्रॉइड 14 आधारित फनटच ओएस 14 वर कार्य करतो. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 8GB रॅम आहे, यासोबतच फोनमध्ये 8GB व्हर्च्युअल रॅम आहे. फोनमध्ये 128GB स्टोरेज आहे, जे मायक्रोएसडीद्वारे 1TB पर्यंत वाढवता येते. तसेच, फोनला पाण्यापासून संरक्षणासाठी IP54 रेटिंग देण्यात आले आहे.
फोटोग्राफीसाठी, Vivo Y300 Plus 5G फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. या सेटअपचा प्रायमरी कॅमेरा 50MP चा आहे. यासोबत 2MP चा सेकंडरी कॅमेरा उपलब्ध आहे. तसेच, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, ज्यामध्ये 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. वेब सर्फिंग आणि इतर मूलभूत कार्यांसह ही बॅटरी दोन दिवसांपर्यंत टिकण्याची क्षमता असते.