iPhone 15 Plus
ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी Amazon ने अखेर Amazon Great Summer Sale चे आयोजन केले आहे. अखेर प्राईम मेंबर्ससाठी हा सेल सुरु झाला आहे. उद्या 1 मे रोजी दुपारी 12 वाजतापासून हा सेल सर्व Amazon ग्राहकांसाठी सुरु होणार आहे. या सेलमध्ये जवळपास सर्व इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांवर मोठ्या सवलती मिळणार आहेत. महागडे स्मार्टफोन्स, फ्रिज, TV इ. सर्व उपकरणांवर डिस्काउंट ऑफर केले जात आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात डील्स-
Also Read: OnePlus 13s च्या भारतीय लाँचची पुष्टी! पहा आगामी जबरदस्त स्मार्टफोनची पहिली झलक
टेक जायंट Apple ने मागील वर्षी iPhone 15 फोन लाँच केला होता. सध्या Amazon सेलदरम्यान हा फोन सवलतींसह 56,749 रुपयांना खरेदी करता येईल. यासह बँक ऑफर्स, EMI आणि एक्सचेंज ऑफरसारखे लाभ देखील तुम्हाला मिळतील. आम्ही तुम्हाला सांगतो की, फोनमध्ये 6.10 इंच लांबीचा डिस्प्ले, Apple A16 बायोनिक प्रोसेसर आणि 12 MP चा फ्रंट कॅमेरा मिळेल. येथून खरेदी करा!
Samsung ने हा Samsung Galaxy S24 Ultra फोन मागील वर्षी भारतात लाँच केला होता. सध्या Amazon सेल दरम्यान हा फोन भारी ऑफर्ससह उपलब्ध आहे. सेलदरम्यान तुम्हाला हा फोन 93,990 रुपयांना खरेदी करता येईल. यासह तुम्हाला बँक ऑफर्स, EMI कॅशबॅक इ, सुविधा मिळतील. एवढेच नाही तर, जुना फोन एक्सचेंज करायचे असल्यास एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. येथून खरेदी करा!
OnePlus 13R हा फोन फ्लॅगशिप किलरने या वर्षी जानेवारी महिन्यात लाँच केला आहे. या फोनवर सध्या भारी सवलती मिळत आहेत. हा फोन सेलदरम्यान 39,999 रुपयांना खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात बँक ऑफर्स, EMI, एक्सचेंज ऑफर मिळतील. यासह OnePlus Buds 3 मोफत मिळतील. या फोनमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स मिळतील. येथून खरेदी करा!
महत्त्वाचे लक्षात घ्या की, सेलदरम्यान प्रोडक्ट्सच्या किमतीत जवळपास बदलत राहतील.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.