OnePlus 13s च्या भारतीय लाँचची पुष्टी! पहा आगामी जबरदस्त स्मार्टफोनची पहिली झलक
OnePlus कंपनी लवकरच OnePlus 13 सिरीजअंतर्गत एक नवीन फोन आणणार आहे.
Amazon लिस्टिंगद्वारे OnePlus 13s फोनच्या भारतीय लाँचची पुष्टी झाली आहे.
फोटोग्राफीसाठी आगामी OnePlus 13s फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल.
फ्लॅगशिप किलर म्हणून प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता OnePlus कंपनी लवकरच OnePlus 13 सिरीजअंतर्गत एक नवीन फोन आणणार आहे. हा फोन OnePlus 13s या नावाने लाँच केला जाईल, असे बोलले जात आहे. यापूर्वी, कंपनीने या मालिकेअंतर्गत OnePlus 13 आणि OnePlus 13R फोन आणले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, OnePlus 13S फोनसाठी समर्पित मायक्रोसाइट देखील Amazon वर लाईव्ह झाली आहे.
Also Read: 6000mAh बॅटरी, 200MP कॅमेरा असलेल्या Vivo फोनवर भारी Discount! आकर्षक डील अजिबात चुकवू नका
Amazon लिस्टिंगद्वारे फोनच्या भारतीय लाँचची पुष्टी झाली आहे. सध्या कंपनीने फोनच्या लाँचिंगची तारीख जाहीर केलेली नाही. जाणून घेऊयात सर्व तपशील-
OnePlus 13s
आगामी OnePlus 13s साठी एक डेडिकेटेड मायक्रोसाइट प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वर लाईव्ह करण्यात आली आहे. या साईटवर हा फोन ‘Coming Soon’ टॅगसह सूचीबद्ध करण्यात आला आहे. आम्ही सांगितल्याप्रमाणे, कंपनीने अद्याप या फोनच्या लाँचिंग तारखेची पुष्टी केली नाही. जर जुन्या लीक्सवर विश्वास ठेवला तर, कंपनी 2025 च्या दुसऱ्या तिमाहीत फोन लाँच करू शकते. हा फोन जूनमध्ये लाँच केला जाऊ शकतो, असे बोलले जात आहे.
Amazon लिस्टिंगद्वारे पुष्टी झाली आहे की, हा फोन दोन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध असेल. लीकनुसार, त्यात ऑब्सिडियन ब्लॅक आणि पर्ल व्हाइट कलर पर्याय मिळू शकतात. याशिवाय, या फोनची विक्री Amazon वर उपलब्ध असेल.
OnePlus 13s चे अपेक्षित तपशील
OnePlus 13s हा कंपनीचा प्रमुख स्मार्टफोन असू शकतो. कंपनी पहिल्यांदाच एस मॉनिकर असलेला फोन बाजारात लाँच करण्यात सज्ज झाली आहे. जर लीकवर विश्वास ठेवायचा असेल तर, हा फोन 1.5k AMOLED डिस्प्लेसह येऊ शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असेल. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 सीरीज प्रोसेसर असू शकतो. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 16GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज मिळू शकते.
लीकनुसार, फोटोग्राफीसाठी आगामी OnePlus 13s फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल. या सेटअपमध्ये प्रायमरी कॅमेरा OIS सपोर्टसह येऊ शकतो. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध असू शकतो. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये बॅटरी 6000mAh किंवा त्याहून अधिक असू शकते. यासह, 80W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट देखील मिळू शकतो.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile