Important! लेटेस्ट Vivo V50e का खरेदी करावा? ‘या’ 7 पॉईंट्ससह जाणून घ्या सविस्तर माहिती

Updated on 24-Apr-2025
HIGHLIGHTS

नुकतेच कंपनीने आपला नवा फोन Vivo V50e भारतात लाँच केला.

Vivo V50e फोनमध्ये तुम्हाला एक स्लिम प्रोफाइल मिळेल.

विवोच्या या फोनमध्ये तुम्हाला अनेक AI फीचर्स मिळतात.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo ने अलीकडेच भारतात आपली नवी Vivo V50 सिरीज लाँच केली आहे. या सिरीजअंतर्गत अनेक स्मार्टफोन्स लाँच करण्यात आले आहेत. ही सिरीज कंपनीने मध्यम श्रेणीमध्ये भारतात सादर केले आहेत. नुकतेच कंपनीने आपला नवा फोन Vivo V50e भारतात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन अनेक आकर्षक कॅमेरा फीचर्ससह लाँच करण्यात आला आहे. तसेच, या फोनमध्ये अनेक फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स आहेत. चला तर मग जाणून घेऊयात Vivo V50e फोन का खरेदी करावा?

Also Read: Best Smartphones for Students: अगदी 10,000 रुपयांच्या बजेटमध्ये विद्यार्थ्यांसाठी बेस्ट 5G फोन, पहा यादी

Vivo V50e च्या 10 विशेषता

किंमत

Vivo V50e हा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला स्मार्टफोन भारतीय बाजारात फक्त 28,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या किमतीत हा फोन तुम्हाला काय देतो, ते पाहुयात-

डिझाईन

Vivo V50e च्या डिझाइनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये तुम्हाला एक स्लिम प्रोफाइल मिळेल. याशिवाय, हा फोन खूप हलका आहे. कंपनीने हा फोन दोन कलर ऑप्शन्समध्ये लाँच केला आहे, तुम्ही तो सफायर ब्लू आणि पर्ल व्हाइट कलरमध्ये खरेदी करू शकता. या फोनमध्ये तुम्हाला IP68 आणि IP69 रेटिंग देखील मिळते. हलका आणि मजबूत फोन असल्यामुळे खरेदीसाठी उत्तम पर्याय ठरेल.

डिस्प्ले

Vivo V50e मध्ये 6.77-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. हा फोन FHD+ रिझोल्यूशनसह HDR10+ आणि Widevine L1 प्रमाणपत्रासह येतो. याशिवाय, तुम्हाला फोनमध्ये व्हायब्रण्ट व्हिज्युअल्स मिळतील.

परफॉर्मन्स

उत्तम परफॉर्मन्ससाठी, या Vivo V50e स्मार्टफोनमध्ये डायमेन्सिटी 7300 प्रोसेसर उपलब्ध आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Vivo V40e मध्येही हाच प्रोसेसर आढळला, हा एक लोकप्रिय फोन ठरला होता. तसेच, या फोनवर मल्टीटास्किंग देखील चांगले आहे.

कॅमेरा

कॅमेरामध्ये साधारण नेमीसारखे फीचर्स आहेत. Vivo V50e स्मार्टफोनमध्ये, तुम्हाला ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो, त्यात 50MP Sony IMX882 सेन्सर आहे, जो OIS सह येतो. फोनमध्ये 8MP चा अल्ट्रावाइड लेन्स देखील आहे. या फोनमध्ये तुम्हाला ZEISS कॅमेरा मिळत नाही.

बॅटरी

Vivo V50e स्मार्टफोनमध्ये 5600mAh बॅटरी आहे, जी संपूर्ण दिवस सहज चालेल. या फोनच्या बॅटरीसह, तुम्हाला 90W जलद चार्जिंगचे समर्थन मिळेल. ही बॅटरी 45 मिनिटांत पूर्णपणे चार्ज करण्याची क्षमता ठेवतो.

AI फीचर्स

विवोच्या या फोनमध्ये तुम्हाला अनेक AI फीचर्स मिळतात. होय, या फोनमध्ये तुम्हाला कॅमेऱ्यासह अनेक AI फीचर्स मिळतात. जसे की तुम्हाला AI इरेजर 2.0, AI फोटो एन्हान्सर, AI इमेज एक्सपांडर आणि बरेच काही मिळेल. याव्यतिरिक्त, इतर AI फीचर्समध्ये तुम्हाला AI नोट असिस्ट, जेमिनी इंटिग्रेशन, AI ट्रान्सक्रिप्ट असिस्ट, सर्कल टू सर्च इ. फीचर्स मिळतील.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :