तुम्ही आपल्या लॅपटॉपमध्ये पिक्चर पासवर्ड लावू शकता.
'पिक्चर पासवर्ड' हे विंडो लॅपटॉपमध्ये आढळणारे एक सीक्रेट फिचर आहे.
आपल्याला फक्त स्क्रीनवर दिसत असेल्या पिक्चरवर 3 ठिकाणे क्लिक करावे लागेल.
Laptop Tips (image credit: pexels.com)
Laptop Tips: लॅपटॉपवर दररोज काम करताना आपण बरेचदा आपल्या लॅपटॉपचे पासवर्ड विसरतो. किंवा तुमच्या लॅपटॉपचे पासवर्ड तुम्हाला लक्षात राहत नाही. जर अशी समस्या आहे तर, आता तुम्ही आपल्या लॅपटॉपमध्ये पिक्चर पासवर्ड लावू शकता. या पिक्चर पासवर्डद्वारे तुम्ही तुमचे लॅपटॉप सुरक्षित ठेवू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की, ‘पिक्चर पासवर्ड’ हे विंडो लॅपटॉपमध्ये आढळणारे एक सीक्रेट फिचर आहे, जे क्वचितच लोकांना माहिती असेल.
लॅपटॉप पिक्चर पासवर्डमध्ये, आपल्याला फक्त स्क्रीनवर दिसत असेल्या पिक्चरवर 3 ठिकाणे क्लिक करावे लागेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, या 3 ठिकाणी क्लिक केल्यावर, आपला लॅपटॉप सहजपणे अनलॉक होईल. ज्यांना लॅपटॉपमध्ये दररोज काहीतरी नवीन करायला आवडेल, त्यांच्यासाठी हे फिचर मजेशीर आहे. आपल्या विंडो लॅपटॉपमध्ये पिक्चर पासवर्ड कसा सेट करावा, ते पाहुयात.
तुमच्या विंडो लॅपटॉपमध्ये पिक्चर पासवर्ड कसा ठेवायचा?
सर्वप्रथम आपल्या लॅपटॉपमध्ये Window + I प्रेस करा. यानंतर सर्च वर जा आणि पिक्चर पासवर्ड सर्च करा.
आता तुम्हाला Set up a Picture Password चा पर्याय दिसेल. या ऑप्शनवर क्लिक करा.
यानंतर, आपल्याला पुढील विंडोमध्ये अनेक ऑप्शन्स दिसतील. खाली स्क्रोल करून आपल्याला ‘पिक्चर पासवर्ड’ सह ऑप्शन सिलेक्ट करावे लागेल.
त्यानंतर ‘Add’ ऑप्शनवर टॅप करा. यानंतर आपल्याला आपला लॅपटॉप पासवर्ड प्रविष्ट करावा लागेल.
आता एक पिक्चर आपल्या समोर ओपन होईल. पिक्चर पासवर्ड सेट करण्यासाठी आपल्याला स्क्रीनवर दिसत असलेल्या 3 ठिकाणे क्लिक करावे लागेल.
हे तीन क्लिक आपल्या लॅपटॉपचा पासवर्ड सेट करतील. लॅपटॉप उघडण्यासाठी तुम्हाला पासवर्ड टाकण्याची गरज नाही.
आता लॅपटॉप ओपन करण्यासाठी तुम्हाला समोर दिसणाऱ्या फोटोच्या त्या तीन भागांवर क्लिक करायचे आहे. त्यावर क्लिक केल्याने तुमचा लॅपटॉप अनलॉक होईल.
आम्ही तुम्हाला सांगतो की, सायबर अटॅक आणि पासवर्ड हॅकिंगच्या बाबतीत आजच्या डिजिटल युगात ही एक सुरक्षित पद्धत देखील असल्याचे सिद्ध होते. हॅकर्सद्वारेही अशा लॉकना हॅक करता येणार नाही.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.