Smartphones Tips: महत्त्वाची कामे करत असताना आपण बरेचदा फोनमध्ये DND म्हणेजच Do Not Disturb हा मोड ऑन करतो. DND सुरु केल्याने कोणत्याही फोन कॉल, संदेश किंवा अलर्टची कोणतीही सूचना तुम्हाला मिळत नाही. त्यामुळे काम करत असताना तुमचे लक्ष विचलित होणार नाही आणि तुम्ही तुमचे काम एकाग्रतेने पूर्ण करू शकता.
मात्र, आपल्याला माहितीच आहे की, कधीकधी आपत्कालीन परिस्थितीत हे फिचर आपल्यासाठी समस्येचे कारण बनते. कारण DND सुरु असताना, तुम्ही तुमच्या फोनच्या सर्व महत्त्वाच्या सूचना चुकवता. अशी परिस्थिती टाळण्यासाठी, तुम्हाला DND मोडमध्ये सेटिंग करावी लागेल, ज्यानंतर DND सुरु असतानाही तुम्हाला महत्त्वाचे कॉल प्राप्त होतील. जाणून घेऊयात सविस्तर-
smartphones tips and tricks
DND मोडमध्ये महत्त्वाचे कॉल्स कसे मिळतील?
सर्वप्रथम DND मोडमध्ये कॉल रिसीव्ह करण्यासाठी, तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनचे सेटिंग्ज ओपन करावे लागेल.
यानंतर, तुम्हाला खाली स्क्रोल करावे लागेल आणि साउंड्स आणि व्हायब्रेशन ऑप्शन्सवर जावे लागेल.
येथे तुम्हाला Do Not Disturb चा पर्याय मिळेल. त्यानंतर, डू नॉट डिस्टर्ब ऑप्शनवर जाऊन तुम्हाला कॉल आणि मेसेजवर क्लिक करावे लागेल.
येथे तुम्ही विशेषत: काही संपर्क निवडू शकता, ज्यांचे कॉल तुम्ही DND मध्ये देखील मिस करू इच्छित नाही.
आता येथे तुमचे महत्त्वाचे संपर्क सिलेक्ट करा, यानंतर तुमचे कॉल DND वर देखील येतील.
याव्यतिरिक्त, तुम्ही रिपीटेड कॉलसाठी रिंगकरता टॉगल देखील ऑन करू शकता. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, जर कोणी तुम्हाला सतत 3 पेक्षा जास्त वेळा कॉल करत असेल तर तुम्हाला त्याचे कॉल नोटिफिकेशन येईल. डू नॉट डिस्टर्ब मोडमध्ये उपलब्ध असलेल्या या फीचरबद्दल क्वचितंच लोकांना माहिती आहे. या गुप्त फीचर्सच्या मदतीने तुम्हाला DND मोडमध्येही महत्त्वाचे कॉल प्राप्त होतील. याशिवाय, इतर कॉल्स आणि नोटिफिकेशन्समुळे तुम्हाला त्रास देखील होणार नाही.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile