Apple Scary Fast Event: 30 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या इव्हेंटमध्ये नवीन iMac आणि Macbook Pro होणार लाँच?

Updated on 25-Oct-2023
HIGHLIGHTS

Appleने आपल्या स्पेशल Scary Fast इव्हेंटची घोषणा केली आहे.

आगामी Apple Scary Fast Event 2023 मध्ये नवीन Mac डिव्हाइसेस सादर केले जाऊ शकतात.

Scary Fast Event 30 ऑक्टोबर 2023 रोजी आयोजित केला जाईल.

Apple लव्हर्स लक्ष द्या! Appleने आपल्या स्पेशल Scary Fast इव्हेंटची घोषणा केली आहे. कंपनी या महिन्याच्या शेवटी हा कार्यक्रम आयोजित करणार आहे. या कार्यक्रमात कंपनीकडून अनेक मोठ्या घोषणा केल्या जाऊ शकतात. आगामी Apple Scary Fast Event 2023 मध्ये नवीन Mac डिव्हाइसेस सादर केले जाऊ शकतात. कंपनीने आपले अधिकृत मीडिया आमंत्रण शेअर करून या खास कार्यक्रमाची माहिती दिली आहे.

Apple Scary Fast Event

Apple स्पेशल Scary Fast Event 30 ऑक्टोबर 2023 रोजी आयोजित केला जाईल. हा इव्हेंट 5 p.m. PT. ला सुरु होणार आहे. कंपनीने पाठवलेल्या आमंत्रणात असे लिहिले आहे की, तुम्हाला Apple चा खास कार्यक्रम ऑनलाइन पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. Apple.com वर ट्यून करा.

या आमंत्रणात फाइंडर-स्टाईल फेस आहे, जो केवळ macOS वर उपलब्ध आहे. हे नवीन मॅक प्रोडक्ट लाँच करण्याच्या दिशेने निर्देश करत आहे, असे म्हटले जात आहे. मात्र, कंपनीने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. हा आगामी कार्यक्रम व्हर्च्युअल आहे आणि ऑनलाइन होस्ट केला जाईल, अशी माहिती मिळाली आहे.

आगामी इव्हेंटमध्ये ‘हे’ प्रोडक्ट्स लाँच होण्याची शक्यता

या इव्हेंटमध्ये नक्की कोणत्या डिवाइसबद्दल घोषणा होणार आहे, याबद्दल सध्या कोणतीही माहिती कंपनीने अधिकृतपणे दिलेली नाही. अहवालानुसार, इव्हेंटमध्ये नवीन iMac आणि MacBook Pro सादर केले जातील. मागील काही रिपोर्ट्सनुसार, ऍपल मॅक लाइनअप अपडेटसह लाँच करण्याच्या तयारीत आहे. यावेळी नवीन मॉडेल्समध्ये नवीन चिप उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

अहवालांवर विश्वास ठेवला तर, Apple या इव्हेंटमध्ये नवीन MacBook Pro सोबत नवीन 24-इंच लांबीचा iMac देखील सादर करू शकते. त्यात Apple ची नवीन M3 चीप मिळू शकते. याशिवाय, या कार्यक्रमात 13 इंच लांबीचा मॅकबुक प्रो आणि इतर हाय लेव्हल प्रो मॉडेल लाँच केले जाऊ शकतात.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :