New Aadhaar App Launched
आपणा सर्वांना माहितीच आहे की, तुम्हाला कोणतेही सरकारी काम करायचे असेल किंवा गैर-सरकारी काम त्यासाठी तुम्हाला अनेक प्रकारच्या कागदपत्रांची आवश्यकता असते. याव्यतिरिक्त, अनेक औपचारिक किंवा अनौपचारिक कामांसाठीही लागणाऱ्या महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक म्हणजे तुमचे Aadhaar Card होय. मात्र, जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल किंवा त्यात काही चूक असेल तर तुमचे काम अडकू शकते. त्यामुळे, तुमचे आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे. जर तुमचे आधार कार्ड 10 वर्षे जुने असेल तर, त्यांना 14 जून 2025 पर्यंत त्यांचे आधार अपडेट करावे लागेल. सध्या आधार कार्ड अपडेट करणे अत्यावश्यक झाले आहे.
Also Read: AC Deals: उन्हाळ्यासाठी व्हा रेडी! ‘या’ ठिकाणी अगदी भारी Discount सह मिळतायेत स्प्लिट एसी
आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही बायोमेट्रिक आणि डेमोग्राफिक माहिती अपडेट करू शकता. मात्र, 14 जूननंतर तुम्हाला ऑनलाईन आधार अपडेट करण्यासाठी शुल्क भरावे लागू शकते. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात तुम्ही तुमचे आधार कार्ड कसे अपडेट करू शकता.
जर तुम्ही तुमचे 10 वर्षे जुने आधार कार्ड अजून अपडेट केले नसेल, तर तुम्ही ते मोफत अपडेट करून घेऊ शकता. आधार ऑनलाईन अपडेट करण्यासाठी सोपी प्रक्रिया पुढीलप्रमाणे-
कृपया लक्षात ठेवा की, तुमचे 10 वर्षे जुने आधार कार्ड 14 जूनपर्यंत अपडेट करणे आवश्यक आहे. आधार ऑनलाइन अपडेट करण्यासाठी तुम्ही myAadhaar पोर्टल वापरू शकता. या पोर्टलवर तुम्ही तुमचे नाव, पत्ता, जन्मतारीख आणि मोबाईल नंबर अपडेट करू शकता. तुमचे आधार कार्ड ऑफलाइन अपडेट करण्यासाठी, तुम्हाला आधार नोंदणी केंद्राला भेट द्यावी लागेल. फिंगरप्रिंट, आयरीस स्कॅन इत्यादी बायोमेट्रिक डेटा अपडेट करण्यासाठी तुम्हाला शुल्क देखील भरावे लागेल.