TRAI New Rules 2025
आपणा सर्वांना माहितीच आहे की, आजकाल सर्वसामान्यांच्या हातात स्मार्टफोन हा असतोच. स्मार्टफोनद्वारे तुमचे अनेक कामे होत असतात. मात्र, याच स्मार्टफोनद्वारे तुम्हाला दररोज स्पॅम कॉल्स आणि फ्रॉड मॅसेजेससारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. आम्ही तुम्हाला सांगतो की, TRAI म्हणजेच भारतीय दूरसंचार प्राधिकरणाने स्पॅम कॉल्स थांबवण्यासाठी नियम अधिक कडक केले आहेत. TRAI ने याबाबत अधिकृत X अकाउंटद्वारे पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. TRAI ने TCCCPR नुसार 2018 मध्ये सुधारणा केली आहे.
Also Read: 50MP कॅमेरासह येणाऱ्या Samsung Galaxy S24+ 5G फोनवर Discount, होईल हजारो रुपयांची बचत
नव्या नियमानुसार, 10 अंकी क्रमांकाचा गैरवापर थांबेल, तसेच टेलिमार्केट्स नव्या नंबर सिरीजचे पालन करावे लागेल. त्यानुसार, ग्राहक दहा नंबर सिरीजवरून येणाऱ्या टेलिमार्केटिंग कॉलच्या समस्येपासून मुक्त होतील. तसेच, यासाठी, रिपोर्ट करण्याची सुविधा देखील सोपी करण्यास सांगितले आहे. एवढेच नाही तर, यात टेलिकॉम कंपन्यांवर कारवाई होण्याचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, टेलिकॉम कंपन्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, TRAI ने कमर्शियल कम्युनिकेशनसाठी 10 आणखी मोबाईल नंबर आधीच ब्लॉक केले आहेत. आता यासाठी 1600 आणि 140 या सिरीजपासून सुरु होणार्रे क्रमांक तयार केले जातील. लक्षात घ्या की, TRAI च्या नव्या नियमाचे उल्लंघन केल्यास अनोंदणीकृत टेलिमार्केटर्सवर दंड आकारला जाईल. जर पहिल्या वेळी नियम मोडले तर, 15 दिवसांसाठी निलंबन होईल. त्यांनतर नियम मोडल्यास एक वर्षासाठी टेलिकॉम संसाधन डिस्कनेक्ट केले जाऊ शकते.
एवढेच नाही तर, ऑपरेटर्सवर दंड देखील आकारला जाऊ शकतो. लक्षात घ्या की, या दंडाची सुरुवातीची किंमत 2 लाख रुपये असणार आहे. ज्याची मर्यादा 5 लाखांपर्यंतही जाऊ शकते. तसेच, पुहा नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास 10 लाखांपर्यंत देखील दंड होण्याची शक्यता आहे. मात्र, दूरसंचार कंपन्यांनी या दंडात्मक कारवाईवर आक्षेप नोंदवला आहे.