आता PAN Card धारकांना 10,000 रुपयांचा दंड?
Aadhaar Card प्रमाणेच तुमचे दुसरे महत्त्वाचे ओळखपत्र आणि दस्तऐवज म्हणून PAN Card चा वापर केला जातो. मात्र, आता बातमी आहे की PAN Card धारकांनाही 10,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात येऊ शकतो. होय, सरकारने आता पॅन कार्डबाबात मोठा निर्णय घेतला आहे. असाच निर्णय काही काळापूर्वी आधार कार्ड अपडेटबाबत देखील घेतला गेला होता. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या पॅन कार्ड धारकांबद्दल घेण्यात आला आहे.
आपणा सर्वांना माहितीच आहे की, पॅन कार्ड आपले आर्थिक ओळखपत्र होय. तसेच, पॅन कार्ड नसेल तर तुमचे आर्थिक कामे कुठलेही आर्थिक व्यवहार होणे, जवळजवळ अशक्यच असते. जर तुम्हाला कुठले कर्ज घ्यायचे असेल, कर भरायचे असेल किंवा साधे बँकेत खाते जरी उघडायचे असेल तर, पॅन कार्डची आवश्यकता असते. वर सांगितल्याप्रमाणे, पॅन कार्ड विषयी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
आपणा सर्वांना माहितीच आहे की, सरकारने अलीकडेच PAN 2.0 लाँच केले आहे. याद्वारे डुप्लिकेट पॅन कार्डचा वापर संपूर्णपणे बंद करण्याचे सरकारचे उद्दिष्ट दिसत आहे. मात्र, यानंतर देखील जर कुणी फसवे आणि बनावटी किंवा एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असतील तर, तुम्हाला सावध होण्याची गरज आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, आयकर विभागाने बनावटी पॅन कार्ड धारकांवर सख्त कारवाई करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
सरकारच्या नव्या निर्णयानुसार, जर तुमच्याकडे एकापेक्षा अधिक पॅन कार्ड असेल आणि तुम्ही ते अजूनही लंपटवून ठेवलेले आहे किंवा त्याला सरेंडर केले नाही तर, तुमच्या कारवाई केली जाणार आहे. महत्त्वाचे लक्षात घ्या की, एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असणाऱ्या व्यक्तींना तब्बल 10,000 रुपयांचा दंड ठोठावला जाईल. जर तुम्हाला ही रक्कम भरायची नसेल तर, तुमचे अधिकचे पॅन कार लगेच सरेंडर करा.
PAN 2.0 बद्दल थोडक्यात बोलायचे झाल्यास, काही महिन्यांपूर्वी PAN 2.0 ला सरकारने मान्यता दिली आहे. याद्वारे सरकारला बनावटी पॅन कार्ड वापरणे आणि याद्वारे होणारी फसवणूक टाळण्याचे कार्य करायचे आहे. दरम्यान, जर एखाद्याने मुद्दाम बनावटी किंवा नकळत एकापेक्षा अधिक पॅन कार्ड जवळ ठेवल्यास आढळले, तर त्यावर आता करवी केली जाणार आहे.