Digit.in
  • न्यूज
  • फिचर्स
  • How to
  • व्हिज्युअल स्टोरी
  • English
  • Hindi
  • Tamil
  • Kannada
  • Telugu
  • Malayalam
  • Bangla
  • Marathi
Login / Register is disabled Login
Home » News » General » कुणी करतोय का तुमच्या Aadhaar Card चा गैरवापर? घरबसल्या तपासण्यासाठी सोपी प्रोसेस, ‘अशा’प्रकारे करा रिपोर्ट

कुणी करतोय का तुमच्या Aadhaar Card चा गैरवापर? घरबसल्या तपासण्यासाठी सोपी प्रोसेस, ‘अशा’प्रकारे करा रिपोर्ट

By Reshma Zalke | Updated on 02-Mar-2025
Add DIGIT as a preferred source
Follow Us on Google News Follow Us
HIGHLIGHTS

सर्वात महत्त्वाचे ओळखपत्र म्हणजेच तुमचे Aadhaar Card होय.

तुमचे आधार कार्ड कुठे वापरले गेले आहे ते कसे तपासावे? पहा सोपी प्रक्रिया

तुमच्या आधार कार्डचा कुणी गैरवापर करतोय? हे कसे कळेल.

कुणी करतोय का तुमच्या Aadhaar Card चा गैरवापर? घरबसल्या तपासण्यासाठी सोपी प्रोसेस, ‘अशा’प्रकारे करा रिपोर्ट
Reshma Zalke Reshma Zalke
02-Mar-2025

तुमचे सर्वात महत्त्वाचे ओळखपत्र म्हणजेच तुमचे Aadhaar Card होय. लक्षात घ्या की, तुमचे आधार कार्ड हे मुख्य सरकारी कागदपत्रांपैकी एक आहे. हे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI द्वारे जारी केले जाते. तुमच्या प्रत्येक महत्त्वाच्या कामामधील मुख्य दस्तऐवज म्हणजेच तुमचा आधार कार्ड होय. याचा वापर बँकिंग, आरोग्य क्षेत्र आणि मोबाईल कनेक्शन इ. अनेक कामांसाठी केला जाऊ शकतो. यामुळे, लोकांचे फोन नंबर आणि बँक खाती जोडलेली राहतात. मात्र, अनेकदा तुमच्या आधार कार्डचा गैरवापर देखील होतो. हेच कारण आहे की फसवणूक करणारे लोकांच्या आधार कार्डचा गैरवापर करून फसवणूक करतात.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

पण तुमच्या आधार कार्डचा गैरवापर होतोय, हे तुम्हाला कळणार कसे? तुम्हाला देखील हा प्रश्न पडला असेल तर, काही काळजी करू नका. कारण, या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देणार आहोत. हे जाणून घेण्यासाठी आम्ही तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत, जेणेकरून तुमचे आधार कार्ड कुठे वापरले गेले आहे हे तुम्हाला कळेल.

Also Read: Important! ‘या’ तारखेआधी मोफत अपडेट करा तुमचे Aadhaar Card, अन्यथा नंतर येईल अडचण

तुमचे आधार कार्ड कुठे वापरले गेले आहे ते कसे तपासायचे?

  • आधार कार्डचा इतिहास तपासण्यासाठी तुम्हाला uidai.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
  • या साइटवर तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल.
aadhaar card
  • त्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड भरावा लागेल. यानंतर तुम्हाला OTP मिळेल, तो एंटर करा.
  • आता लॉग इन करा आणि ऑथेंटिकेशन हिस्ट्री सेक्शनमध्ये जा.येथून तुम्हाला कळेल की तुमचा आधार कुठे वापरला गेला आहे.

‘अशा’ प्रकारे करा रिपोर्ट

जर तुम्हाला आधार कार्डशी संबंधित कोणतीही चुकीची कृती आढळली आहे, जी तुम्ही केली नसेल, तर त्वरित रिपोर्ट करणे आवश्यक आहे. जर तुमच्या आधार कार्डचा गैरवापर झाला असेल तर, UIDAI हेल्पलाइन क्रमांक 1947 वर कॉल करून तक्रार दाखल करा. तसेच, help@uidai.gov.in वर ईमेल करा. यामुळे तुमच्या आधारचा गैरवापर होणे त्वरित थांबेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

No posts for this criteria.
Mobile Recharge Plans
  • Airtel Recharge Plans
  • BSNL Recharge Plans
  • Reliance JIO Recharge Plans
  • VI Recharge Plans
  • icon
  • icon
  • icon
  • icon
SUBSCRIBE Subscribe for the industry's biggest tech news
Enter your email to get notified about our new solutions
By submitting your email, you agree to our
Terms and Privacy Notice.
CONNECT WITH US
  • icon Times Center, FC-6, 1st Floor, Sector 16A, Film City, Noida - 201301
  • icon (+91-120-6776999)
    (1800 121 0005)
  • icon Suggestion: editor@digit.in
    Business: business@digit.in
    Website: sales@digit.in
© 2026 Digit.in, All rights reserved
  • icon
  • icon
  • icon
  • icon
icon
  • About Us
  • Contact Us
  • Advertise with us
  • Regulatory
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
  • Disclaimer
© 2026 Digit.in, All rights reserved
Digit.in
Logo
Digit.in
Logo