Flipkart Sale : आपोआप रद्द का होत आहेत ऑर्डर ? कंपनीने दिले उत्तर…

Flipkart Sale : आपोआप रद्द का होत आहेत ऑर्डर ? कंपनीने दिले उत्तर…
HIGHLIGHTS

Flipkart Sale मध्ये आपोआप रद्द होतायेत ऑर्डर्स

iPhone 13 ऑर्डर केल्यास अनेकांचे ऑर्डर्स आपोआप रद्द झाले

फ्लिपकार्टवर कारवाई करण्याची मागणी

ई-कॉमर्स वेबसाइट ऍमेझॉन आणि फ्लिपकार्टचा फेस्टिव्हल सेल 23 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. या सेलमध्ये ग्राहकांना iPhone च्या लेटेस्ट मॉडेल तसेच iPhone 13 वर उत्तम ऑफर्स मिळत आहेत. सेल दरम्यान, iPhone 13 ची विक्री देखील झाली. अनेक ग्राहकांनी सेलमध्ये 70 हजार किमतीचे iPhone 13 रु. 42,619 या कमी किमतीत खरेदी केले. मात्र आता iPhone ची ऑर्डर रद्द झाल्याने ग्राहक चिंतेत आहेत. फ्लिपकार्ट त्यांना न कळवता त्यांच्या ऑर्डर्स रद्द करत असल्याच्या तक्रारी यूजर्स सातत्याने करत आहेत.

हे सुद्धा वाचा : Reliance Jio चा सर्वात दमदार प्लॅन! एका वर्षासाठी रिचार्जचे टेंशन संपले, Hotstar देखील मोफत

आपोआप रद्द होत आहेत ऑर्डर्स 

 

 

कृपया लक्षात घ्या की, सध्या iPhone 13 128 GB Amazon आणि Flipkart या दोन्हींवर आऊट ऑफ स्टॉक आहे. केवळ iPhone चा स्टॉक संपला नाही तर ज्या वापरकर्त्यांनी फ्लिपकार्टवरून iPhone 13 (128 GB) ऑर्डर केले होते, त्यांच्यापैकी अनेकांच्या ऑर्डर आपोआप रद्द झाल्या आहेत. यानंतर अनेक युजर्सनी ट्विटरवर फ्लिपकार्टवर टीकाही केली. मात्र, Apple ने अद्याप या मॉडेलमधील स्टॉकबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.

Flipkart ने दिले उत्तर 

एका मुलाखतीत फ्लिपकार्टच्या प्रवक्त्याने सांगितले की, "आम्ही नेहमीच ग्राहकांच्या पसंतींचे रक्षण करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही देशभरात जवळपास ७० टक्के iPhone ऑर्डर वितरित केल्या आहेत आणि उर्वरित वितरित केल्या जात आहेत. सेलरने काही कारणास्तव केवळ 3% ऑर्डर रद्द केल्या आहेत." 

फ्लिपकार्ट विक्रीच्या नावाखाली फसवणूक करत असून केवळ मार्केटिंगसाठी बनावट सेल दाखवून लोकांना त्रास देत असल्याचे युजर्सचे म्हणणे आहे. अनेक युजर्सनी यासाठी फ्लिपकार्टवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे. iPhone 13 विकत घेतलेल्या अनेक वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर फ्लिपकार्टकडे परतावा आणि रद्द केल्याबद्दल तक्रार केली आहे.

 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo