Reliance Jio चा सर्वात दमदार प्लॅन! एका वर्षासाठी रिचार्जचे टेंशन संपले, Hotstar देखील मोफत

Reliance Jio चा सर्वात दमदार प्लॅन! एका वर्षासाठी रिचार्जचे टेंशन संपले, Hotstar देखील मोफत
HIGHLIGHTS

वार्षिक वैधतेसह Reliance Jioचे तीन जबरदस्त प्लॅन्स

वर्षभरासाठी देशातील कुठल्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग मिळेल

यासह, डिजनी+ हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध

रिलायन्स JIO आपल्या वापरकर्त्यांना अनेक उत्तम प्लॅन्स देत आहे. JIO चे हे प्लॅन प्रत्येक रेंजमध्ये येतात. यामध्ये तुम्हाला दैनंदिन डेटा आणि फ्री कॉलिंगसोबत अतिरिक्त दीर्घकाळ वैधतेसारखे फायदेही मिळतात. काही असे प्लॅन्सदेखील आहेत, ज्यामुळे फोन पुन्हा पुन्हा रिचार्ज करण्याचा टेन्शनही दूर होतो. यामध्ये तुम्हाला दररोज 3 GB डेटा आणि फ्री कॉलिंग देखील मिळेल. याशिवाय, यापैकी काही प्लॅनमध्ये कंपनी DISNEY + HOTSTAR चे फ्री सब्सक्रिप्शन देखील देत आहे.

हे सुद्धा वाचा : फक्त 12,499 रुपयांमध्ये SAMSUNG ने लाँच केला नवीन HD स्मार्ट टीव्ही, जाणून घ्या फीचर्स

JIO चा 4,199 रुपयांचा प्लॅन

JIO चा हा प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. प्लॅनमध्ये कंपनी दररोज 3 GB नुसार एकूण 1095 GB डेटा देत आहे. जिओच्या या वार्षिक योजनेचे सदस्य संपूर्ण वर्षभर देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग करू शकतात. या प्लॅनमध्ये दररोज 100 मोफत SMS सह, तुम्हाला Disney + Hotstar Premium चे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळेल, जे एका वर्षासाठी वैधतेसह येईल.

JIO चा 2,999 रुपयांचा प्लॅन

एक वर्षाच्या वैधतेच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2.5 GB डेटा दिला जात आहे. प्लॅनमध्ये Jio 6 व्या वर्धापन दिनानिमित्त लाभ म्हणून, तुम्हाला इंटरनेट वापरण्यासाठी 75 GB अतिरिक्त डेटा देखील मिळेल. कंपनी या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 मोफत SMS देखील देत आहे. प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या अतिरिक्त फायद्यांमध्ये Disney+ Hotstar सह Jio ऍप्सची मोफत सदस्यता समाविष्ट आहे.

JIO चा 2,879 रुपयांचा प्लॅन

JIO चा हा प्लॅन 365 दिवसांचा आहे. यामध्ये तुम्हाला दररोज 2 GB डेटा मिळेल. या प्लॅनचे सदस्य देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग करू शकतात. कंपनी प्लॅनमध्ये दररोज 100 मोफत SMS चा लाभही देत ​​आहे. कंपनीचा हा वार्षिक प्लॅन Jio ऍप्सच्या फ्री ऍक्सेससह येतो. 

 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo