Dance of the Hillary - APK
India Pakistan war: आपणा सर्वांना माहितीच आहे की, 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या प्रत्युत्तरामुळे म्हणजेच ‘ऑपरेशन सिंदूर’ मुळे पाकिस्तान संतापला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, 8-9 मे च्या रात्री भारताने पाकिस्तानविरुद्ध मोर्चा उघडला आहे. तिन्ही सैन्यांनी पाकिस्तानवर हल्ला केला आहे. या दरम्यान, आता भारतावर सायबर हल्ल्याच्या बातम्या समोर येत आहेत. होय, प्रत्यक्षात लोकांना WhatsApp, ईमेल आणि इतर सोशल मीडियाद्वारे ‘Dance of the Hillary’ नावाची एक अज्ञात लिंक मिळत आहे. हा एक धोकादायक व्हायरस आहे, ज्याद्वारे शत्रू देश भारतावर सायबर हल्ल्याची योजना आखत आहे, अशी माहिती मिळाली आहे.
Also Read: Samsung Galaxy S25 5G वर मिळतोय तब्बल 7000 रुपयांचा Discount, ही ऑफर पुन्हा मिळणार नाही
जर तुम्हाला तुमच्या WhatsApp, Email किंवा कोणत्याही सोशल मीडियावरून एखाद्या अनोळखी नंबरवरून किंवा अकाउंटवरून ‘Dance of the Hillary’ नावाची फाइल मिळाली तर ती चुकूनही उघडू नका. खरं तर, हा भारतावर सायबर अटॅक आहे, असे सांगितले जात आहे. फक्त ‘डान्स ऑफ द हिलरी’ नावाची फाइलच नाही तर तुम्ही ‘tasksche.exe’ फॉरमॅट किंवा ‘.exe’ फॉरमॅटच्या कोणत्याही फाईलवर टॅप करू नये.
या प्रकारच्या सायबर अटॅकमुळे, हल्लेखोर तुमच्या डिव्हाइस आणि खाजगी डेटामध्ये सहजपणे ऍक्सेस करू शकतात. कोणत्याही चुकीच्या हेतूंसाठी त्याचा वापर करू शकतात, जेणेकरून तुमचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे, जर तुम्हाला अशी कोणतीही फाइल किंवा व्हिडिओ मिळाला असेल तर सावधगिरी बाळगा. त्या व्हिडिओ किंवा फाइलवर क्लिक करण्याची चूक करू नका. एवढेच नाही तर, युद्धाशी संबंधित खोटी माहिती शेअर करणारे अनेक X हँडल ब्लॉक करण्यात आले आहेत.
भारत पाकिस्तान युद्धाबद्दल थोडक्यात बोलायचे झाल्यास, पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर हल्ला चढवला आहे. काल 8 मे ते 9 मे च्या रात्री भारताच्या तिन्ही सैन्याने पाकिस्तानवर हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान भारताने पाकिस्तानच्या F-16 या लढाऊ विमानांसह अनेक ड्रोन आणि क्षेपणास्त्रे नष्ट केली.