कुणी करतोय का तुमच्या Aadhaar Card चा गैरवापर? घरबसल्या तपासण्यासाठी सोपी प्रोसेस, 'अशा'प्रकारे करा रिपोर्ट
तुमचे सर्वात महत्त्वाचे ओळखपत्र म्हणजेच तुमचे Aadhaar Card होय. लक्षात घ्या की, तुमचे आधार कार्ड हे मुख्य सरकारी कागदपत्रांपैकी एक आहे. हे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI द्वारे जारी केले जाते. तुमच्या प्रत्येक महत्त्वाच्या कामामधील मुख्य दस्तऐवज म्हणजेच तुमचा आधार कार्ड होय. याचा वापर बँकिंग, आरोग्य क्षेत्र आणि मोबाईल कनेक्शन इ. अनेक कामांसाठी केला जाऊ शकतो. यामुळे, लोकांचे फोन नंबर आणि बँक खाती जोडलेली राहतात. मात्र, अनेकदा तुमच्या आधार कार्डचा गैरवापर देखील होतो. हेच कारण आहे की फसवणूक करणारे लोकांच्या आधार कार्डचा गैरवापर करून फसवणूक करतात.
पण तुमच्या आधार कार्डचा गैरवापर होतोय, हे तुम्हाला कळणार कसे? तुम्हाला देखील हा प्रश्न पडला असेल तर, काही काळजी करू नका. कारण, या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देणार आहोत. हे जाणून घेण्यासाठी आम्ही तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत, जेणेकरून तुमचे आधार कार्ड कुठे वापरले गेले आहे हे तुम्हाला कळेल.
Also Read: Important! ‘या’ तारखेआधी मोफत अपडेट करा तुमचे Aadhaar Card, अन्यथा नंतर येईल अडचण
जर तुम्हाला आधार कार्डशी संबंधित कोणतीही चुकीची कृती आढळली आहे, जी तुम्ही केली नसेल, तर त्वरित रिपोर्ट करणे आवश्यक आहे. जर तुमच्या आधार कार्डचा गैरवापर झाला असेल तर, UIDAI हेल्पलाइन क्रमांक 1947 वर कॉल करून तक्रार दाखल करा. तसेच, help@uidai.gov.in वर ईमेल करा. यामुळे तुमच्या आधारचा गैरवापर होणे त्वरित थांबेल.