Important! ‘या’ तारखेपर्यंत Free मध्ये तुमचे Aadhar Card ऑनलाईन अपडेट करा, अन्यथा द्यावे लागेल शुल्क

Updated on 06-Mar-2024
HIGHLIGHTS

2023 पासून Aadhar Card ऑनलाईन मोफतमध्ये अपडेट करण्याची प्रक्रिया सुरु

अखेर Aadhar Card मोफत अपडेट करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे.

नागरिक 14 मार्च 2024 पर्यंत आधार कार्ड मोफत अपडेट करू शकतात.

गेल्या वर्षी पासून Aadhar Card ऑनलाईन मोफतमध्ये अपडेट करण्याची प्रक्रिया सुरु आहे. आम्ही तुम्हाला सांगतो, आता अखेर Aadhar Card मोफत अपडेट करण्याची शेवटची तारीख अगदी जवळ आली आहे. होय, डिसेंबर 2023 मध्ये भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणान (UIDAI) ने Aadhar मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत वाढवली होती. मोफतमध्ये अपडेट करण्यासाठी 14 मार्च 2024 ही नवीन मुदत ठेवण्यात आली होती. ही मुदत आता अवघ्या पुढील आठवड्यामध्ये संपुष्टात येणार आहे.

हे सुद्धा वाचा: How to: युजर्ससाठी Good News! Flipkart UPI सेवा भारतात लाँच, ‘अशा’प्रकारे चुटकीसरशी ऍक्टिव्ह करा

म्हणजेच, सध्या नागरिक केवळ myAadhaar पोर्टलवर त्यांचे आधार कार्ड मोफत अपडेट करू शकतात. मात्र, जर आपण ते ऑफलाइन अपडेट केले तर, आपल्याला एकूण 50 रुपये शुल्क आकारले जाईल.

aadhar card

आधार कार्डमधील पुढील तपशील अपडेट करता येतील:

Aadhar Card धारक 14 मार्चपर्यंत UIDAI वेबसाइटवरून त्यांचे नाव, पत्ता, फोटो आणि Aadhar Card मधील इतर गोष्टी मोफतमध्ये अपडेट करू शकतात. वर सांगितल्याप्रमाणे, जर तुम्ही कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये गेलात तर तुमच्या आधार कार्डचे तपशील अपडेट करण्यासाठी तुमच्याकडून 50 रुपये शुल्क आकारले जाईल.

Aadhar Card ऑनलाईन अपडेट करण्याची प्रक्रिया

मोफत तुमचे आधार कार्ड अपडेट करणे अगदी सोपे आहे. फक्त पुढीलप्रमाणे सर्व माहिती स्टेप्स बाय स्टेप फॉलो करा:

  • सर्वप्रथम आधार क्रमांक वापरून https://myaadhaar.uidai.gov.in/ वर लॉग इन करा.
  • त्यानंतर ‘proceed to update address’ या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पाठवलेला वन-टाइम पासवर्ड (OTP) एंटर करा.
  • पुढे ‘Document Update’ निवडा आणि येथे तुम्हाला तुमच्या पत्त्याचे वर्तमान माहिती दिसेल.
  • ही माहिती एकदा तपासून घ्या आणि पुढील हायपर लिंकवर क्लिक करा.
  • यानंतर, ड्रॉपडाउन सूचीमधून आयडेंटिटी प्रूफ आणि ऍड्रेस प्रूफ दस्तऐवज निवडा. या नंतर ऍड्रेस प्रूफ अपलोड करा.
  • यानंतर ‘सबमिट’ पर्यायावर क्लिक करून सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  • अखेर 14 अंकी अपडेट रिक्वेस्ट नंबर म्हणजेच URN तयार होईल आणि अपडेट रिक्वेस्ट स्वीकारली जाईल.

‘अशा’प्रकारे वरील सर्व स्टेप्स फॉलो करून तुम्ही आधार कार्ड अपडेट साठी रिक्वेस्ट करू शकता. पण ही प्रक्रिया वाचल्यानंतर तुम्हाला आणखी एक प्रश्न पडला असेल की, ऍड्रेस प्रूफ कसा अपलोड करावा. तर, त्याबाबत देखील तुम्ही काळजी करू नका. ऍड्रेस प्रूफ अपलोड करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे:

  • UIDAI च्या अधिकृत लिंकला भेट द्या.
  • त्यानंतर लॉग इन करा आणि ‘नाव/लिंग/जन्म तारीख आणि पत्ता अपडेट’ पर्याय निवडा.
  • ‘अपडेट आधार ऑनलाईन’ ऑप्शनवर क्लिक करा.
  • त्यानंतर ‘पत्ता’ सिलेक्ट करा आणि पुढे जा.
  • स्कॅन कॉपी अपलोड करा आणि आवश्यक माहिती प्रविष्ट करा. अशाप्रकारे तुम्ही ऍड्रेस प्रूफ अपलोड करू शकता.
Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :