How to: युजर्ससाठी Good News! Flipkart UPI सेवा भारतात लाँच, ‘अशा’प्रकारे चुटकीसरशी ऍक्टिव्ह करा

How to: युजर्ससाठी Good News! Flipkart UPI सेवा भारतात लाँच, ‘अशा’प्रकारे चुटकीसरशी ऍक्टिव्ह करा
HIGHLIGHTS

भारतीय युजर्ससाठी Flipkart UPI सेवा भारतात लाँच झाली आहे.

या सेवेसाठी ई-कॉमर्स कंपनीने Axis बँकेसोबत भागीदारी केली आहे.

Flipkart UPI सेवा Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल.

Flipkart युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, Flipkart UPI सेवा भारतात लाँच झाली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या सेवेसाठी ई-कॉमर्स कंपनीने Axis बँकेसोबत भागीदारी केली आहे. आता वापरकर्ते QR कोडच्या मदतीने Flipkart ॲपद्वारे पेमेंट, वीज बिल भरणे, मोबाइल रिचार्ज इ. सहजपणे करू शकतील. Flipkart वापरकर्त्यांसाठी UPI पेमेंट करण्यासाठी एक वेगळा पर्याय म्हणून उदयास येईल. बघा सविस्तर-

हे सुद्धा वाचा: Redmi ने दोन Popular स्वस्त स्मार्टफोनच्या किमतीत केली कपात, जाणून घ्या नवी किंमत आणि स्पेसिफिकेशन्स। Tech News

Flipkart UPI
Flipkart UPI

Flipkart UPI सर्व्हिस

Flipkart UPI सेवा Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल. नवीनतम UPI पेमेंट फिचरचा लाभ घेण्यासाठी, वापरकर्त्यांना त्यांच्या फोनवर फ्लिपकार्ट ॲपची लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड करावे लागेल. जर तुम्ही सध्याचे फ्लिपकार्ट वापरकर्ते असाल तर तुम्ही हे ॲप लेटेस्ट व्हर्जनवर अपडेट करू शकता. फ्लिपकार्टचे लेटेस्ट अपडेट Google Play Store आणि App Store वर उपलब्ध झाले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो, Paytm पेमेंट बँक अनेक समस्यांना तोंड देत असताना Flipkart ने UPI पेमेंट सेक्टरमध्ये प्रवेश केला आहे, अशा चर्चा सुरु आहेत.

Flipkart UPI सर्व्हिस पुढीलप्रमाणे ऍक्टिव्ह करा.

  • सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये Flipkart ॲप ओपन करा.
  • यानंतर ‘Scan & Pay’ पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला ‘My UPI’ पर्याय निवडावा लागेल.
  • यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेचे नाव सिलेक्ट करावे लागेल.
  • आता तुमचे बँक तपशील प्रविष्ट करा.

त्यानंतर, Flipkart आता SMS सह तुमच्या बँक तपशीलांची पडताळणी करेल. अशाप्रकारे तुमचा Flipkart UPI सक्रिय होईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo